NEET UG 2026 MHT-CET-2024
देश विदेश

प्रतिक्षा संपली! NEET UG 2026 चा निकाल जाहीर; आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल देशात पहिले, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

NEET Result 2026: एनटीएने NEET UG 2026 चा निकाल जाहीर केला असून आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला. 11.21 लाख विद्यार्थी पात्र ठरले असून महिलांची कामगिरी पुरुषांपेक्षा अधिक सरस ठरली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाच्या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पंशुल बंसल यांनी देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला आहे. दोघांनाही 720 पैकी 715 गुण मिळालेत. उत्कृष्ट कामगिरीमुळे दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होतोय. याशिवाय देशातील अनेक राज्यांतील विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत चांगलं यश मिळवलंय.

यंदा भारतातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमधील 5,440 परीक्षा केंद्रांवर NEET UG परीक्षा घेण्यात आलीये. या परीक्षेला सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 11.21 लाख उमेदवार एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

NTA ने निकाल नियोजित वेळेत जाहीर केला आहे. त्यामुळे मेडिकल प्रवेश प्रक्रिया आणि कौऊंसिलिंगचं वेळापत्रक वेळेवर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. असं एजन्सीने स्पष्ट केलंय. तसंच सर्व उमेदवारांची मार्कशिट neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

58 टक्क्यांहून अधिक महिला ठरल्या पात्र

देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांनी 13 भाषांमध्ये ही परीक्षा दिलीये. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण 58 टक्क्यांहून अधिक आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणारं बहुतेक विद्यार्थी 17 ते 19 वर्षे वयोगटातील आहेत.

NEET UG 2026 मध्ये 138 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 690 पेक्षा जास्त गुण मिळवलेत. त्यापैकी 93 टक्के विद्यार्थी पहिल्यांदाच NEET परीक्षा देत होते. तसंच या गटातील 99 टक्के विद्यार्थी 17 ते 19 वर्षे वयोगटातील आहेत.

सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

  • 19 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 700 पेक्षा जास्त गुण मिळवले.

  • 1,492 विद्यार्थ्यांनी 650 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले.

  • 10,160 विद्यार्थ्यांनी 600 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले.

  • 90,780 विद्यार्थ्यांनी 500 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले.

प्रवर्गानुसार पात्र ठरलेले उमेदवार

जनरल : 2.91 लाख

OBC-नॉन क्रीमी लेयर (OBC-NCL) : 5.12 लाख

SC : 1.59 लाख

ST : 63,716

जनरल-EWS : 95,026

PwBD : 3,666

PWD : 303

महिलांची कामगिरी पुरुषांपेक्षा सरस

यंदा पात्र ठरलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण यशस्वी उमेदवारांपैकी 58 टक्के महिला आहेत. परीक्षेला बसलेल्या महिलांपैकी 56.8 टक्के महिला पात्र ठरल्या. तर पुरुषांमध्ये हा आकडा 55.1 टक्के आहे.

NEET UG मध्ये उत्तर प्रदेश अव्वल

सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील पात्र विद्यार्थ्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. या राज्यातील 1.7 लाखांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर लक्षद्वीपमधील 43 विद्यार्थ्यांनीही यश मिळवलंय.

8 राज्यांतील विद्यार्थ्यांनी गाजवली टॉप रँक

देशातील आठ राज्यांमधील 17 विद्यार्थ्यांनी 700 पेक्षा जास्त गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसंच 26 विद्यार्थ्यांनी 690 पेक्षा जास्त गुण मिळवलेत. देशातील 66 शहरांमधील 138 विद्यार्थ्यांनी 690 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर 705 पेक्षा जास्त गुण मिळवणारे टॉप 17 विद्यार्थी पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू आणि तेलंगणा या आठ राज्यांतील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai : मुंबईत दुर्दैवी घटना! बिल्डिंगच्या १६ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Crime: जळगाव हादरले! ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आधी अपहरण, नंतर मारहाण करत आरोपींचं भयंकर कृत्य

वजन कमी करण्यासाठी प्या पुदिना, लिंबू आणि मधाचे पाणी

Lung health: धुम्रपानच नाही तर या सवयीही करतात फुफ्फुसांचं नुकसान; औषधांपेक्षा हे ५ नैसर्गिक उपाय ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT