NEET UG Result 2023 Saam TV
देश विदेश

NEET UG Result 2023: प्रतीक्षा संपली! नीट परीक्षेचा निकाल जाहीर, देशात प्रबंजन जे तर राज्यात श्रीनिकेत रवी पहिल्या क्रमांकावर; पाहा टॉपर्सची लिस्ट

NEET UG Result Update: बहुतेक यशस्वी उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक लागतो.

Priya More

NEET UG Result 2023: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट युजीचा ( NEET UG 2023) आज निकाल जाहीर केला आहे. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती यांनी नीट परीक्षेमध्ये 99.99 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेले बहुतेक यशस्वी उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक लागतो.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातून 20 38596 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामधील 11,45,976 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी उत्तर प्रदेशचे आहे. उत्तर प्रदेश राज्याचे 1,39,961 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात आणि राजस्थान या राज्यातील सर्वांत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्राचे 1,31,008 विद्यार्थी आणि राजस्थानचे 1,00,316 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती यांनी नीट परीक्षेमध्ये 99.99 टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर या 99.99 टक्के गुण मिळवलेल्या देशातील 50 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. मुंबईतल्या खारमध्ये राहणाऱ्या श्रीनिकेत रवी सातव्या क्रमांक पटकावला आहे. तर तनिष्का भगतने 27 वा आणि रिद्धी वजारींगकरने 44 वा क्रमांक पटकावला आहे.

राज्यातील आर्या पाटील, हादी सोलकर यांनी अपंग प्रवर्गातील टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. पलक शहाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. आयुष रामटेकेने अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. तर, शिवम पाटील इतर मागास वर्ग प्रवर्गातील टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

नीट परीक्षा पास होऊन पुढील प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 720 पैकी 137 गुण (50 परसेन्टाईल ) आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी ,एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना 720 पैकी 107 गुण (40 परसेन्टाईल) आवश्यक आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पात्रताधारक जवळपास पन्नास हजारांनी वाढले आहेत. नीटची परीक्षा 499 शहरातील 4097 केंद्रावर परीक्षा पार पाडली होती. 14 परीक्षा केंद्र देशाबाहेरही होते. मराठी, हिंदी, गुजरातीसह 13 भाषांमध्ये ही नीट परीक्षा पार पडली होती.

नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या टॉपर्सची लिस्ट -

पहिला क्रमांक - प्रबंजन जे

दुसरा क्रमांक - बोरा वरुण चक्रवर्ती

तिसरा क्रमांक- कौस्तव बाउरी

चौथा क्रमांक- प्रांजल अगरवाल

पाचवा क्रमांक - ध्रुव आडवान

सहावा क्रमांक - सूर्य सिद्धार्थ एन

सातवा क्रमांक - श्रीनिकेत रवि

आठवा क्रमांक - स्वयं शक्ति त्रिपाठी

नववा क्रमांक - वरुण एस

दहावा क्रमांक - पार्थ खंडेलवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT