NEET NEET, CUET, JEE Main Exam : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कामकाजाची समिक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समिती कर्मचारी आणि परीक्षा केंद्राच्या आउटसोर्सिंग कमी करणं. जास्तीत जास्त प्रवेश परीक्षा घेण्यात याव्यात. नीट प्रमुख प्रवेश परीक्षांच्या प्रयत्नाची संख्या मर्यादित करण्यात याव्यात अशा सुचना देण्यात आल्यात. केंद्र सरकारने २१ ऑक्टोबर रोजी भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख आर राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आलाय.
समितीनुसार ऑफलाइन परीक्षा केल्या पाहिजेत. जास्तीत जास्त परीक्षा ऑनलाईन केल्या पाहिजेत. तर जेथे ऑनलाइन परीक्षा घेता येणार नाही त्यांना हायब्रिड परीक्षाचा पर्याय उपलब्ध ठेवावे. यासह वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET सह प्रमुख परीक्षांमधील प्रयत्नांची संख्या मर्यादित करणे. परीक्षांच्या अखंडतेवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी 'आउटसोर्स' कर्मचारी आणि केंद्रांची भूमिका कमी करणे.
यासारख्या शिफारसी समितीद्वारे केल्या जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, समितीने मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्यात येणाऱ्या अडचणी , धोके, आणि सुरक्षा उपाय काय याबाबत २२ बैठका घेतल्यात. समितीने विद्यार्थी आणि पालक तसेच जाणकारांकडून सूचना मागवण्यात आल्यात. प्राप्त झालेल्या ३७,००० हुन अधिक सुचनांचा विचार करण्यात आला. वैद्यकीय प्रवेश परीक्षा एनईईटी आणि पीएचडी प्रवेश परीक्षा नेटमधील कथित अनियमितेबाबत केंद्राने जुलैमध्ये ही समिती स्थापन केली होती.
सूचना
जेईई मेन प्रमाणे नीटचे पेपरही अधिक टप्प्यात केल्या पाहिजेत.
ऑफलाईन परीक्षा घेतल्या पाहिजेत. जेथे ऑनलाई परीक्षा घेणं शक्य नसले तेथे हायब्रीडपद्धतीने परीक्षा घेतल्या पाहिजेत.
जेथे ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नाही त्यांना हा प्रश्नांचे पत्र डिजिटल मोड पाठवले प पाहिजेत. तसेच उत्तरे ओएमआर शीटवर लिहिली पाहिजेत.
मेडिकल प्रवेश परीक्षा नीटसह प्रमुख परीक्षांचे प्रयत्नांची संख्या लिमिटेड केली पाहिजे.
सीयूईटच्या परीक्षेत विषयांची संख्या कमी केली पाहिजे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.