Gang Rape Saam Tv
देश विदेश

Crime: NEETच्या परीक्षेची तयारी अन् विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार, अश्लील VIDEO काढला

Rajasthan Alwar Crime News: अलवरमध्ये चार नरधमांनी मिळून NEETच्या परिक्षाची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलीस नराधमांचा शोध घेत आहे.

Bhagyashree Kamble

देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. अशातच राजस्थानच्या अलवरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अलवरमध्ये चार नरधमांनी मिळून NEETच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच तिला रूग्णालयाजवळ सोडून पळ काढला आहे. अत्याचारादरम्यान, त्यांनी व्हिडिओही काढला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलीस स्टेशन अधिकारी दिनेश मीणा यांनी या घटनेसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी भिवाडी येथील रहिवासी आहे. ती अलवरमध्ये तिच्या भावासोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. तसेच ती NEETच्या परिक्षेची तयारी करत होती. मुलगी कोचिंग क्लासला टेम्पोने जात होती. टेम्पोमधून जात असताना टेम्पोमध्ये ४ आरोपीही उपस्थित होते.

आरोपींनी टेम्पोमध्ये कुणीही नसल्याचा फायदा घेत मुलीचं तोंड दाबलं आणि तिचं अपहरण केलं. तसेच तिला निर्जन ठिकाणी नेलं. अंधारात निर्जन ठिकाणी घेऊन गेल्यानंतर नराधमांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर नराधमांनी मुलीला एका रूग्णालयाबाहेर सोडून तेथून पळ काढला. या घटनेनंतर मुलगी कशीतरी घरी पोहोचली आणि तिने कुटुंबाला याची माहिती दिली. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

यादरम्यान, नराधमांनी लैंगिक अत्याचार करत असताना व्हिडिओ देखील शूट केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीला रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी पोलीस चार नराधमांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी गडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

SCROLL FOR NEXT