NEET 2026 Saam Tv
देश विदेश

NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

NEET 2026 Exam Cancelled: नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता नीट २०२६ परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

NEET 2026 परीक्षा रद्द

पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली

पेपरफुटीप्रकरणी सीबीआय करणार तपास

पेपरफुटीच्या गंभीर आरोपानंतर नीट २००६ (NEET 2026) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा महत्त्वाची आहे. पण त्यामध्येच पेपरफुटीचा गंभीर आरोप झाल्याने केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नीट परीक्षेचा पेपर लीक

गेल्या काही दिवसांपासून देशभरातून नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याच्या तक्रारी येत होत्या. परीक्षेच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण आहे? पेपर लीकचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे? याचा छडा सीबीआय लावणार आहे.

नीट परीक्षा रद्द (NEET 2026 Exam Cancelled)

नीट २०२६ ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नीट २०२६ चा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. आता याप्रकरणी सीबीआय चौकशी होणार आहे. नीटची परीक्षा रद्द करुन ती पुन्हा घेण्यात येणार आहे. पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे. मात्र, आता ही परीक्षा कधी घेण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नीट परीक्षा ३ मे २०२६ रोजी झाली होती. राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, पेपर फुटल्यामुळे आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ४२ तास आधीच एका विद्यार्थ्याकडे पेपर आला होता. आता ही परीक्षा रद्द करुन पुन्हा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या तारखा लवकरच सांगण्यात येतील. देशातील जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT