NDA government formation LIVE Updates Saam Tv
देश विदेश

NDA चा सरकार स्थापनेचा दावा, राष्ट्रपतींना दिलं पाठिंब्याचे पत्र; 9 जूनला मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

Pm Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी हे रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज एनडीएने राष्ट्रपतींना आपलं समर्थन पत्र दिलं आहे.

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळाल्यानंतर एनडीएने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. एनडीएने राष्ट्रपतींना पाठिंब्याचे पत्र सादर केले आहे. यातच नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीची जोरदार तयारी भाजप आणि मित्रपक्षांकडून सुरू करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 543 सदस्यांच्या लोकसभेत भाजपला 240 जागा मिळाल्या, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 293 जागा मिळाल्या. एनडीएच्या जागांची संख्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.

याआधी एनडीएची आज बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले, "युतीच्या इतिहासातील संख्येच्या दृष्टीने पाहिल्यास हे सर्वात मजबूत आघाडीचे सरकार आहे." विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, "आम्ही कधीही हरलो नाही. 4 जूननंतरचे आमचे आचरण दाखवते की, आम्हाला विजय कसा पचवायचा हे माहित आहे."

एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर ते म्हणाले, "हा विजय न स्वीकारण्याचा आणि या विजयावर पराजयाची सावली पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण असे सर्व प्रयत्न फसले. अशा गोष्टी लवकर संपतात आणि तेच घडते.''

या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) एन चंद्राबाबू नायडू, जनता दलचे (युनायटेड) नितीश कुमार, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे एचडी कुमारस्वामी, अपना दलच्या (एस) अनुप्रिया पटेल, जनसेना पक्षाचे पवन कल्याण आणि भाजपचे नवनिर्वाचित सदस्य आणि एनडीएच्या इतर मित्रपक्षांनी सहभाग घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT