Akhilesh Yadav Saam Tv
देश विदेश

Akhilesh Yadav: एनडीएचे सरकार फार काळ टिकणार नाही, अखिलेश यादव मोदी सरकारवर बरसले

Saam TV News

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर घाणघाती टीका केली. एनडीए सरकार फार काळ टिकणार नाही, कारण जातीयवादी शक्तींना काही काळ यश मिळू शकेल, पण शेवटी त्यांचा पराभव होईल, असे ते म्हणाले आहेत.

शहीद दिनानिमित्त तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या मेगा रॅलीला अखिलेश यादव यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, 'जे सत्तेत आले आहेत ते काही दिवसांचे पाहुणे आहेत.'' भाजप किंवा एनडीएचे नाव न घेता ते म्हणाले, 'केंद्रातील हे सरकार फार काळ टिकणार नाही आणि लवकरच पडेल. अशा जातीयवादी शक्तींना कोणत्याही किंमतीत सत्तेत राहायचे आहे, पण त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत.''

अखिलेश यादव म्हणाले की, केंद्रातील सांप्रदायिक शक्ती कट रचत आहेत आणि देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले, 'ज्या शक्तींना जातीय आधारावर देशाचे विभाजन करायचे आहे, त्यांना काही काळ यश मिळू शकेल, पण शेवटी त्यांचा पराभव होईल. अशा जातीयवादी शक्तींना कोणत्याही किंमतीत सत्तेत राहायचे आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, केंद्रात भाजपप्रणीत सरकार फार काळ टिकणार नाही, कारण त्यांनी लोकांना भीती दाखवून सरकार स्थापन केलं आहे.

अखिलेश यादव यांचं कौतुक करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'तुम्ही उत्तर प्रदेशात जो खेळ केला, त्यामुळे भाजप सरकारने राजीनामा द्यायला हवा होता, पण केंद्रीय तपास यंत्रणा आणि इतर माध्यमांचा गैरवापर ते अद्यापही सत्तेत बसले आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT