Ajit Pawar Disguise Controversy  Saam tv
देश विदेश

Maharashtra Politics : हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, अजित पवारांच्या वेशांतरावरुन सुप्रिया सुळे संतापल्या, लोकसभेत प्रश्नांची सरबत्ती, सत्ताधाऱ्यांकडून उत्तर

Ajit Pawar Disguise Controversy : विमान प्रवास करताना आधारकार्ड बंधनकारक आहे, असं असताना देखील नाव बदलून असा प्रवास कसा केला…? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेशांतरावरुन (Ajit Pawar Disguise Controversy) लोकसभेत सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी प्रश्न उपस्थित केला. विमानप्रवास करताना आधारकार्ड (Aadhar Card) बंधनकारक आहे, असे असतानाही नाव बदलून विमान प्रवास कसा केला? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे (Khasdar Supriya Sule) यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान उपस्थित केला. सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तर दिले.

अजित पवार यांचं बंड आणि सत्ता समावेशाच्या नाट्यामध्ये अजित पवार यांनी वेशांतर करून 10 वेळा दिल्ली (New Delhi) गाठली होती. या गुप्त बैठकांची गुपीत माहिती अजित पवारांनीच उघड केली. जवळपास वर्षभरानंतर आपण सत्तेत कसे गेलो? याची कहाणीच अजित पवार यांनी पहिल्यांदा उलगडली होती.. अजित पवार यांनी सत्ता समावेशावेळी केलेल्या वेशांतरावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील राजकारण तापलेय.

लोकसभेत सुप्रिया सुळे संतापल्या, अजित पवारांच्या वेशांतरवर प्रश्नचिन्ह

शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांनी वेगळी वाट धरली, 40 आमदारांना हाताशी धरत ते सत्तेमध्ये सामील झाले. सत्तेत सहभागी होण्याआधी दिल्लीला 10 वेळा वेशांतर करुन प्रवास केल्याचं स्वत: अजित पवारांनी सांगितलं. त्यानंतर यावरुन सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार यांचं नाव बदलून केलेल्या प्रवासावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सवाल उपस्थित केला. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरु आहे.

हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा - सुप्रिया सुळे

विमान प्रवास करताना आधारकार्ड बंधनकारक आहे, असं असताना देखील नाव बदलून असा प्रवास कसा केला…? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. जेव्हा विमानाने प्रवासी प्रवास करत असतो, अशा वेळी सुरक्षा यंत्रणा चेहऱ्याने सदर प्रवाशांची ओळख पटवतात की चेहरा पाहून सोडलं जातं, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विमान वाहतूक मंत्र्यांना केला.

सत्ताधाऱ्यांकडून चोख प्रत्युत्तर -

अजित पवारांच्या वेशांतराच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी लोकसभेत उत्तर दिले. ते म्हणाले की, आधारकार्ड आणि नावाची ओळख तपासली जाते, सीआयएसएफकडून गेटवर याबाबतची तपासणी केली जाते, आम्हाला संशय आला तर पासपोर्टचाही आधार घेतला जातो. चेहरा आणि नाव हे दोन्ही तपासले जाते, या दोन्हींची ओळख झाल्यानंतरच प्रवाशाला प्रवेश दिला गेला.

Edited by - Namdev kumbhar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

Success Story: २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोवर्स; IPS सचिन अतुलकर आहेत तरी कोण?

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

SCROLL FOR NEXT