NCP Chief Sharad Pawar important statement on compromise With Ajit Pawar Group and Bjp  SAAM TV
देश विदेश

Sharad Pawar News: मनात शंका आणू नका, मी कुठलीही तडजोड करणार नाही; दिल्लीतील बैठकीत शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Sharad Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत पक्षातील नेते तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मनात शंका आणू नका, मी कुठलीही तडजोड करणार, आपल्याला भाजप विरोधातच लढायचं आहेस, असं स्पष्ट सांगितलं आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड केल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा दिला आहे. याच पाठिंब्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा गट विरोधी पक्षात आहे. शरद पवार गटातील आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळेच त्यांना विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला सोडाव लागलं आहे. दरम्यान, शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून प्रयत्न सुरू आहे.

त्यामुळे शरद पवार हे भाजपला पाठिंबा देणार की, विरोधातच राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच सोमवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“मी कधीच तडजोड करणार नाही. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा, आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा” असं शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या भूमिकेवरुन नेहमीच विरोधकांकडून राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यावरुन विरोधक शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

SCROLL FOR NEXT