sharad pawar  saam tv
देश विदेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,'विरोधी पक्ष हे...'

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

Vishal Gangurde

Sharad Pawar News : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाला आहे. महाराष्ट्रातही भाजपने लोकसभेसाठी 'मिशन 45' साठी तयारी केली आहे. राज्यात शिंदे गटाच्या १२ खासदारांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात काँग्रेस अद्याप पक्षाचा अध्यक्ष निवडण्यात मश्गुल आहे. याचदम्यान, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना जिंकण्यासाठी रणनीतीच सांगितली आहे. शरद पवार म्हणाले, ' आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक विरोधी पक्ष एकत्र येऊन लढू शकतात. विरोधी पक्ष हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर एकत्र येऊ शकतात'.

दरम्यान, शरद पवार यांनी स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच देशाच्या सत्तेची कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची केंद्राच्या सत्तेत कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा देखील नाही. तसेच शरद पवार यांनी सर्व केंद्र सरकारच्या विरुद्ध सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, शरद पवार यांच्या या मोठ्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी विरोधी पक्षांचे नेतृत्व कोण करणार ? यावरून अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा झाल्या आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढविल्या आहेत. शरद पवारांच्या या प्रयत्नाला कितपत यश येईल, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT