Naxal Attack On Jawan In Bijapur  Saam Tv
देश विदेश

Naxal Attack: छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षलवादी हल्ला, ९ जवान शहीद

Naxal Attack On Jawan In Bijapur: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य केले आहे. कुटरू रोड येथे लावलेल्या आयईडीच्या हल्ल्यात ९ जवान शहीद झालेत.

Bharat Jadhav

छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद झाल्याची माहिती आहे. नक्षलवाद्यांनी जवानांचं वाहन आयईडी स्फोटानं उडवलं. यात ९ जवान शहीद झालेत. नक्षलवाद्यांनी कुटरू मार्गावर आयईडी पेरून ठेवले होते, त्या मार्गाने सुरक्षा जवानांचे वाहन येताच याचा स्फोट करण्यात आला. यात स्फोटात ९ जवान शहीद झालेत तर ६ ते ८ जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळालीय. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे एक पथक शोध मोहीमेला लागले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दंतेवाडा डीआरजीचे ८ जवान आणि वाहन चालक जवान शहीद झालाय. बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. सुरक्षा दलाच्या जवानांचे वाहन नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटकांनी उडवून दिलं, अशी माहिती आहे. दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर या ठिकाणी सुरक्षा दलाचे हे जवान सर्च ऑपरेशनसाठी गेले होते.

सर्च ऑपरेशनहून परतत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. यात दंतेवाडा डीआरजीचे आठ जवान आणि एक वाहनचालक असे एकूण नऊ जवान शहीद झाले. बस्तरच्या पोलीस महानिरीक्षकांनी ही माहिती दिली. बिजापूर हा छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग आहे. या भागातच नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांच्या वाहनांवर हल्ला केला.

नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटकांनी सुरक्षा दलाच्या वाहनाला उडवून दिलं. या घटनेत वाहनचालक आणि आठ डीआरजी जवान शहीद झाले. बिजापूरच्या कुटरू मार्गावरील बेदरेमध्ये नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. शहीद जवान हे सर्च ऑपरेशन राबवून परतत होते. या सर्च ऑपरेशनमध्ये याच जवानांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. बस्तरच्या पोलीस महानिरीक्षकांच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाने सुरक्षा दलाच्या जवानांचे वाहन उडवून दिले.

यात चालक आणि ८ जवान शहीद झाले. दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूरमध्ये हे जवान सर्च ऑपरेशनसाठी गेले होते. बिजापूरच्या कुटरू मार्गावरील बेदरेमध्ये नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. शहीद जवान हे सर्च ऑपरेशन राबवून परतत होते. या सर्च ऑपरेशनमध्ये याच जवानांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. बस्तरच्या पोलीस महानिरीक्षकांच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाने सुरक्षा दलाच्या जवानांचे वाहन उडवून दिले.

यात चालक आणि ८ जवान शहीद झाले. दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूरमध्ये हे जवान सर्च ऑपरेशनसाठी गेले होते. दंतेवाडा, बाजीपूर आणि नारायणपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ३ दिवसांपासून नक्षलवांद्यांविरोधात मोहीम चालवण्यात येत आहे. यात ५ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळालेत. तर एक जवान शहीद झाला होता. त्यानंतर आमचं पथक परतत होते. सुरक्षा दलाचे पथक बीजापूरच्या अंबेली परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT