US House Speaker Nancy Pelosi's visit to Taiwan
US House Speaker Nancy Pelosi's visit to Taiwan Twitter/@iingwen
देश विदेश

Nancy Pelosi Taiwan Visit: तैवानच्या वादग्रस्त दौऱ्यानंतर नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

न्यूयॉर्क: अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) त्यांचा तैवान (Taiwan) दौरा आटोपून दक्षिण कोरियाला रवाना झाल्या आहेत. पेलोसी मंगळवारी रात्री उशिरा तैवानला पोहोचल्या होत्या. पेलोसी तैवानमध्ये दाखल होताच चीन (China) भडकला आणि तैवानवर अनेक निर्बंध लादले.

एवढेच नाही तर चीनच्या लष्कराने तैवानच्या हवाई हद्दीत नैऋत्य भागात २१ लष्करी विमाने उडवून आपली ताकद दाखवून दिली. चीन हा तैवानला आपल्याच देशाचा भाग मानतो, तर तैवान हा स्वतःला स्वातंत्र्य देश मानतो. यामुळे अमेरिकन (USA) संसदेच्या अध्यक्षांनी तैवानचा दौरा करणे हे चीनला खटकले असून चीनने याचा विरोध करत तैवानवर अनेक निर्बंध लादले. (Nancy Pelosi in Taiwan Live Updates)

हे देखील पाहा -

हा दौरा होऊ नये म्हणून चीनने अनेक धमक्या दिल्या होत्या, मात्र चीनचा विरोध जुगारून पेलोसी यांनी तैवान दौऱ्यावर पाठवले होते. हा दौरा आटपल्यानंतर पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झाल्या आहेत.

चीनच्या विरोधाला न जुमानता अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी मंगळवारी तैवानची राजधानी तैपेई येथे पोहोचल्या. 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा तैवानच्या दौऱ्यावर आहेत.

यापूर्वी 1997 मध्ये तत्कालीन स्पीकर न्यूट गिंग्रिच येथे आले होते. पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे रागावलेल्या चीनने अनेक घोषणा केल्या. चीनने तैवान आणि अमेरिकेला धमकावण्याचे सर्व प्रयत्न केले.

पेलोसीच्या भेटीपूर्वी संपूर्ण तैवानमध्ये सायबर हल्ल्याच्या बातम्या आल्या होत्या. अगदी राष्ट्रपतींची वेबसाईटही हॅक झाल्याची चर्चा होती. तैपेई विमानतळावर बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. चीनची लढाऊ विमाने तैवान सीमेवर उडताना दिसली. चिनी नौदलाने तैवानभोवती युद्धनौका तैनात करून युद्ध सराव केला.

पेलोसी यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

यूएस संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी मंगळवारी रात्री 8.26 वाजता मलेशियाहून तैवानला पोहोचल्या. विमानतळावर तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग वेन (蔡英文 Tsai Ing-wen) यांनी त्यांचे स्वागत केले.

बुधवारी, पेलोसी यांना तैवानच्या संसदेत तैवानचा सर्वोच्च नागरी सन्मान स्पेशल ग्रँड कॉर्डनसह ऑर्डर ऑफ प्रोपियस क्लाउड्सने सन्मानित करण्यात आले.

यावेळी पेलोसी म्हणाल्या की, आम्हाला तैवानच्या मैत्रीचा अभिमान आहे. अमेरिका तैवानला प्रत्येक स्तरावर पाठिंबा देईल. पेलोसी म्हणाल्या, "युनायटेड स्टेट्स तैवानच्या लोकशाहीला पाठिंबा देत राहील."

तैवानच्या 2.3 कोटी नागरिकांसोबतची अमेरिकेची एकता आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, कारण जगाला निरंकुशता आणि लोकशाही यांच्यातील निवडीचा सामना करावा लागतो.

चीनने काय म्हटले?

पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्यानंतर चीनने तैवान आणि अमेरिकेला धमकी दिली. चीन म्हणाला, 'आम्ही या भेटीला विरोध करतो आणि त्याचा तीव्र निषेध करतो. आगीशी खेळणे हे अत्यंत घातक कृत्य आहे. जो आगीशी खेळतो तो स्वतःच खाक होतो.'

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलू. त्याच्या सर्व परिणामांना अमेरिका आणि तैवानच्या स्वातंत्र्य समर्थक आणि फुटीरतावादी शक्ती जबाबदार असतील. तैवानच्या प्रश्नावर चीनची जनता आणि सरकारची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Van Hits Children : ट्रकने २९ मुलांना चिरडले, १८ जण गंभीर; कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना

Abhijeet Patil: माढ्यात माेठ्या राजकीय घडमाेडी, विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; अभिजीत पाटील करणार भाजपला मदत, Video

Freedom At Midnight Cast Unveiled : निखिल अडवाणी यांच्या 'फ्रिडम ॲट मिडनाइट'चा फर्स्ट लूक आऊट; गांधी- नेहरू आणि पटेल यांच्या भूमिकेत कोण दिसणार ?

Covaxin : कोव्हिशिल्डनंतर आता कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Sanjay Raut: सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

SCROLL FOR NEXT