Namo Bharat train pre wedding shoot offer google
देश विदेश

Namo Bharat ट्रेनमध्ये आता बर्थडे आणि प्री-वेडिंग शूट! NCRTC कडून अनोखी ऑफर

Delhi NCR: नमो भारत ट्रेनमध्ये आता वाढदिवस, प्री-वेडिंग आणि फोटोशूटची सुविधा उपलब्ध. NCRTC ने फक्त 5,000 रुपये प्रति तास दराने ही अनोखी सेवा सुरू केली आहे.

Sakshi Sunil Jadhav

दिल्ली-एनसीआरमधील प्रवाशांसाठी आता एक अनोखी आणि आकर्षक सुविधा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम (NCRTC) ने आपल्या अत्याधुनिक Namo Bharat ट्रेन आणि स्टेशन्सना आता खास प्रसंग साजरा करण्यासाठी खुलं केलं आहे. यामुळे आता ट्रेनने प्रवास करण्यासोबतच लोकं वाढदिवस, प्री-वेडिंग शूट, फोटोशूट आणि इतर वैयक्तिक कार्यक्रमही येथे आयोजित करू शकतील.

NCRTC च्या अधिकृत माहितीमध्ये असे सांगितले की, नवीन धोरणानुसार लोक, इव्हेंट ऑर्गनायजर्स किंवा मीडिया, फोटोग्राफी कंपन्या किंवा रनिंग ट्रेन बुक करू शकतात. याशिवाय डिपोमध्ये असलेला इतर स्टाफ फोटोशूट आणि व्हिडिओ शूटसाठी उपलब्ध असणार आहे.

तुम्हाला या सुविधेचा लाभ फक्त 5,000 रुपये एक तासाप्रमाणे मिळेल. विशेष बाब म्हणजे शूट किंवा सजावटीसाठी 30 मिनिटे जास्त वेळ दिला जाईल, तसेच पॅकअपसाठी देखील अर्धा तास वेगळा दिला जाईल. त्यामुळे ग्राहकांना घाई न करता नियोजन करण्याची मुभा मिळेल. हा कार्यक्रम सकाळी 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंतच आयोजित करता येणार आहे. या दरम्यान नियमित प्रवासी सेवा बाधित होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. शूट आणि इव्हेंटदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण देखरेख केली जाईल.

Namo Bharat ट्रेनचे आधुनिक इंटीरियर आणि इंटरनॅशनल डिझाइनमुळे फोटोशूटसाठी ही जागा विशेष आकर्षकपणे तयार केली आहे. त्यामुळे दिल्ली-मेरठ रॅपिड रेल कॉरिडोरवरील नागरिकांसाठी हा एक वेगळा आणि अविस्मरणीय स्थळाचा पर्याय ठरणार आहे. आनंद विहार, गाजियाबाद आणि मेरठ साउथसारख्या स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. छोट्या फॅमिली इव्हेंटपासून मोठ्या जीवनातील महत्त्वाच्या सेलिब्रेशनपर्यंत आता सर्व काही Namo Bharat ट्रेनमध्ये शक्य होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : धनलाभ होणार, हातात पैसा खेळता राहणार; 5 राशींच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार

Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Terror Attack: पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध कट; ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी विट्यात निघाला कॅन्डल मार्च

SCROLL FOR NEXT