Ghaziabad Namo Bharat Train Viral Video Saam Tv
देश विदेश

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, व्हिडीओत दिसलेल्या 'त्या' तरुण-तरुणीचं होणार लग्न

Ghaziabad Namo Bharat Train Viral Video: नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवलेल्या तरुण-तरुणीला आता कायमचे सोबत राहावे लागणार आहे. या दोघांच्या कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेतला. दोघांचे लवकरच लग्न होणार आहे.

Priya More

Summary -

  • नमो भारत ट्रेनमधील कपलच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात मोठी अपडेट

  • तरुण-तरुणीविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल

  • तरुण -तरुणीच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

  • तरुम-तरुणीचे लग्न लावून देण्याचा घेतला निर्णय

  • साखरपुडा झाला आता लवकरच लग्न होणार

धावत्या नमो भारत ट्रेनमध्ये तरुण-तरुणीने शरीरसंबंध ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. आता या प्रकरात महत्वाची अपडेट समोर आली आहे. प्रेमीयुगुलाचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेतला. तरुण-तरुणीचा साखरपुडा झाला असून लवकरच त्यांचे लग्न लावून दिले जाणार आहे. लग्नासाठी शुभ मुहूर्त काढण्याचे काम कुटुंबीयांकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

२० डिसेंबर रोजी ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवतानाचे तरुण-तरुणीचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. एक मिनिट ते तीन मिनिटांपर्यंतचे चार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल व्हिडिओ नमो भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज होते. व्हिडीओमध्ये दिसलेले तरुण आणि तरुणी गाझियाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून बी.टेक आणि बी.सी.ए. पदवी घेत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रेमीयुगलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यावर देखील कारवाई करण्यात आली होती.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुण आणि तरुणीच्या कुटुंबीयांनी दोघांना दूर करत नातेवाईकांच्या घरी पाठवून दिले होते. समाजात बदनामी होईल यामुळे दोघांचे कुटुंबीय देखील कुटुंबही वेगळे झाले. आता अशी माहिती समोर आली आहे की या प्रेमीयुगलांचे लग्न लावून देण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. दोघांचा साखरपुडा झाला असून लवकरच त्यांचे लग्न होणार आहे. लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधला जात आहे.

नमो भारत ट्रेनमध्ये तरुण-तरुणीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरुण-तरुणीवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. त्यांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या ट्रेन ऑपरेटरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिंतेत येऊन तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचे प्राण वाचले. सध्या ही तरुणी आपल्या नातेवाईकाच्या घरी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT