Mysore Accident News Saam tv
देश विदेश

Mysore Accident News: मोठी बातमी! म्हैसूरमध्ये भीषण अपघात; दोन मुलांसह १० जणांचा जागीच मृत्यू

Tirumakudalu-Narasipura Accident: कार आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे...

Gangappa Pujari

Karnataka Accident News: कर्नाटकमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये कार आणि खासगी बसमध्ये हा अपघात झाला असून अपघातात दोन मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील एक जण थोडक्यात बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकात सोमवारी दुपारी कार आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला म्हैसूरजवळील तनरसिंगपुरा येथे झालेल्या या दुर्घटनेत कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू झाला, ज्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या भयंकर अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबद्दल म्हैसूर एसपी सीमा दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलीस बचावकार्य करत आहेत. अथक परिश्रमानंतर मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच अपघातातील जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Accident News)

कालही झाला होता भीषण अपघात...

कर्नाटकात रविवारीही भीषण अपघाताची बातमी समोर आली होती. कर्नाटकातील होस्पेट जवळील दोट्टीहाळ गावाजवळ भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये चौघे सोलापुरातील आहे. दुर्देवी घटना रविवारी घडली. अपघातमध्ये पती-पत्नी आणि लहान मुलांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT