Swati Maliwal Latest News  SAAM TV
देश विदेश

Swati Maliwal : बापानं माझं लैंगिक शोषण केलं, भीतीनं पलंगाखाली लपायचे; स्वाती मालिवाल यांच्या दाव्यानं खळबळ

Swati Maliwal Latest News : बापानेच लहानपणी माझे लैंगिक शोषण केले, तसेच ते मला मारहाण करत होते, असा गंभीर आरोप स्वाती मालिवाल यांनी केला.

Nandkumar Joshi

Swati Maliwal Latest News : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी शनिवारी खळबळजनक दावा केला. बापानेच लहानपणी माझे लैंगिक शोषण केले, तसेच ते मला मारहाण करत होते, असा गंभीर आरोप मालिवाल यांनी केला. (Latest Marathi News)

मी लहान होते, त्यावेळी वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. ते मला मारहाण करायचे. त्यामुळे घाबरून मी पलंगाखाली लपून बसायचे. ते घरी यायचे त्यावेळी खूप भीती वाटायची. मी खूप लहान होते. अनेकदा तर मी पलंगाखाली लपून बसायचे.

त्यावेळी अख्खी रात्र विचार करायचे. महिलांना त्यांचे हक्क कशा पद्धतीने मिळवून द्यायचे. मुली आणि महिलांचे शोषण करणाऱ्यांना धडा शिकवणार असं मनोमन ठरवायची, असं स्वाती मालिवाल यांनी सांगितले.

स्वाती मालिवाल म्हणाल्या, की 'मला अजून आठवते. ते मला मारायला यायचे त्यावेळी माझे वेणी ओढायचे. भिंतीवर जोरात माझे डोके आपटायचे. त्यामुळे मला दुखापत व्हायची. रक्तस्राव व्हायचा. मला खूपच वेदना व्हायच्या. पण ज्यावेळी एखादी व्यक्ती खूपच अत्याचार सहन करते त्यावेळी तिला दुसऱ्याच्या वेदना, दुःख समजते.'

पीडित व्यक्तीला दुसऱ्यांच्या वेदना समजतात. अंतर्मन जागृत होतं. त्या जोरावर ती संपूर्ण व्यवस्था बदलून टाकते. कदाचित माझ्यासोबतही असेच घडले. अनेक जण आहेत, त्यांच्यासोबतही असेच काहीसे घडलेले आहे, असेही स्वाती मालिवाल म्हणाल्या.

२०१५ पासून स्वाती मालिवाल यांच्याकडे दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्षपद

स्वाती मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा आहेत. २०२१ मध्ये स्वाती यांच्याकडे सलग तिसऱ्यांदा महिला आयोगाचं अध्यक्षपद सोपवलं गेलं. स्वाती या २०१५ पासून सलग अध्यक्षपदावर काम करत आहेत.

अलीकडेच स्वाती मालिवाल या चर्चेत आल्या होत्या. महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी त्या स्वतः दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होत्या. त्याचवेळी एका वाहनचालकाने छेड काढल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. स्वाती यांनी स्वतः या घटनेची माहिती ट्विट करून दिली होती.

महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यावर फिरत असताना, एका मद्यधुंद अवस्थेतील वाहनचालकाने त्यांची छेड काढली. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने कारची काच लावून घेत त्यांना फरफटत नेले. देवाच्या कृपेमुळे माझा जीव वाचला असे स्वाती म्हणाल्या होत्या. स्वाती यांना कारचालकाने १० ते १५ मीटर फरफटत नेले होते. दिल्लीच्या एम्सजवळ ही घटना घडली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT