Pahalgam Terror Attack  Saam tv
देश विदेश

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर शिक्षकाचा संताप; शिक्षकाकडून मुस्लीम धर्माचा त्याग, त्यानंतर कोणता धर्म स्वीकारला?

Pahalgam Terror Attack News : पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होतोय. या घटनेनं व्यथित झालेला एका मुस्लिम शिक्षकानं इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुठला आहे हा शिक्षक ? आणि त्याची भूमिका काय आहे ? पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

Girish Nikam

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांची निर्घृण हत्या केली. आयुष्यभरासाठी चांगली आठवण सोबत घेऊन भारताच्या नंदनवनात पर्यटक आले होते. पण दुर्देवाने आयुष्यभरासाठी भळाळती जखम घेऊन इथून घेऊन गेले. गंभीर बाब म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली आहे. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होतोय. दहशतवादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा सूर उमटतोय. दरम्यान या हल्ल्यानंतर व्यथित झालेला पश्चिम बंगालमधील एका मुस्लिम शिक्षक साबिर हुसैन यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पहलगाम सारख्या हिंसक घटनांमध्ये धर्माचा चुकीचा वापर केला जातो. एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारणं कसं योग्य ठरु शकतं? ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. आपण धर्माच्या आधारावर नव्हे, तर एका माणसाच्या रूपात जगायचं ठरवलं आहे, असं मुस्लीम शिक्षक साबीर हुसैन यांनी सांगितलं.

साबीर हुसेन यांच्या विषयी अधिक माहिती पाहुया

साबीर हुसैन दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रहिवासी

बादुरिया येथे आदर्श विद्यापीठात विज्ञान विषयाचे शिक्षक

एक व्हिडीओ पोस्ट करुन निर्णयाची माहिती दिली

धर्म बदलण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु केली

न्यायालयात याचिकाही दाखल केली

कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण

विशेष म्हणजे साबीर हुसैन यांनी हा निर्णय फक्त स्वत:पुरता घेतला आहे. पत्नी आणि मुलांना जो कुठला धर्म निवडायचा असेल तो निवडायचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं साबिर यांनी सांगितलंय. साबिर यांनी मुस्लीम धर्म सोडला असला तरी दुसरा कोणताही धर्म स्वीकारलेला नाही...ते आता निरपेक्ष राहून मानवतेचा धर्मावर चालणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT