Waqf Act protest  Saam tv
देश विदेश

Waqf Act : वक्फ कायद्याविरोधात मुर्शिदाबाद पेटलं; हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू, परिसरात तणाव

massive protest against Waqf Act : वक्फ कायद्याविरोधात मुर्शिदाबाद पेटलं आहे. वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वातावरण तापलं आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधात हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकाऱ्याने शनिवारी माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचार प्रभावित शमरेरगंज भागात जाफराबादमधील एका घरात बाप-लेकाचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे. दोघांचाही मृतदेह त्यांच्याच घरात आढळला. बापलेकांना जवळील रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

हिंसाचारानंतर पोलिसांनी संबंधित क्षेत्रात संचारबंदी लावली आहे. परिसरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ११८ हून अधिक लोकांना ताब्यात घेतलं आहे. सध्या शमरेरगंज भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, 'एक लक्षात ठेवा, ज्या कायद्याविरोधात लोक आंदोलन करत आहेत. तो कायदा आम्ही तयार केलेला नाही. तो कायदा केंद्राने तयार केला आहे. त्यामुळे तुम्ही उत्तर केंद्र सरकारकडे मागितले पाहिजे'. ममता बॅनर्जी यांनी त्यांची कायद्याविषयी भूमिका स्पष्ट केली. 'वक्फ कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच वक्फ कायद्याबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारले पाहिजे.

पश्चिम बंगालने सांगितलं की, ' सुटी येथून ७० तर समसेरगंज येथून ४१ जणांना हिंसाचा प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे'. मुर्शिदाबादमध्ये संचारबंदी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे'. सुटी आणि समसेरगंज भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊ दिले जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT