mumbai serial blasts mastermind dawood ibrahim admit in pakistan karachi hospital Saam Tv
देश विदेश

Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? रुग्णालयात उपचार सुरू, पाकिस्तानात काय घडतंय?

Dawood Ibrahim News: मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानात विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

Underworld Don Dawood Ibrahim News

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानात विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्यावर विषप्रयोग केल्याचं सांगितलं जातंय. यामध्ये दाऊदची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळतंय. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दाऊदवर विषप्रयोग झाल्यानंतर पाकिस्तानातील कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमधील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दाऊदला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती गुप्त ठेवली गेली आहे.

कारण, पाकिस्तानी आणि भारतीय दोन्ही अधिकाऱ्यांनी या बातमीला अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. त्याच्या अचानक प्रकृती बिघडण्यामागे विषबाधा हे कारण असू शकते, असे अंदाज बांधले जात असून, त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

दरम्यान, दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्यानं पुष्टी केली की, मागील काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला ज्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. 

भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेल्या दाऊद इब्राहिमचा संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह विविध गुन्हेगारी कारवायांशी संबंध आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटामागे तो मास्टरमाईंड आहे, ज्यात २५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. तसेच हजारो लोक जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT