mumbai after the son ended his life the mother and sister also also died Saam Tv News
देश विदेश

मुंबईतून गावाकडे जाताच आयुष्य संपवलं, आई अन् बहिणीनं विषाचा घोट घेतला, संपूर्ण कुटुंबाचा अंत; काही वर्षापूर्वी...

After Mohit end his life his mother and sister also died : विष शरीरात पसरू लागताच वेदनेनं ओरडू लागल्यावर शेजाऱ्यांना दोघींचा आवाज ऐकू आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Prashant Patil

मुंबई : मुंबईतून गावाकडे गेल्यानंतर तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाची पंचविशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलाने अशा पद्धतीने आयुष्य संपवल्याने घाबरलेल्या आईने मृतदेहाला चिकटून अर्धा तास आक्रोश केला. 'मला सोडून जाऊ शकत नाहीस, तुझं लग्न करायचं होतं,' म्हणत तिने आक्रोश केला. बहिणीने सुद्धा एकच आक्रोश केला. यानंतर दोघींनी सुद्धा विष प्राशन केलं. विष शरीरात पसरू लागताच वेदनेनं ओरडू लागल्यावर शेजाऱ्यांना दोघींचा आवाज ऐकू आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज गुरुवारी सकाळी आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोहित कन्नौजिया असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याचे वडील अंगद कन्नौजिया यांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं होतं. मोहित मुंबईत काम करत होता. तो फक्त सात दिवसांपूर्वीच गावी आला होता. बुधवारी तो आई कौशल्या देवी आणि बहीण सुप्रियासोबत औषध घेण्यासाठी हरपूरला जात होता. यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना गोरखपूरमधील हरपूर बुधत परिसरातील कुचदेहरी येथील आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औषध घेण्यासाठी गेल्यानंतर मोहितचा आईसोबत कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. त्यानंतर मोहित रागावला आणि घरी परतला. आईने विचारले की तू कुठे जात आहेस, तो म्हणाला, मला जायचं नाही. मग आई आणि बहीण पुढे निघून गेल्या. मोहितने घरी आल्यावर पंख्याला गळफास घेतला. त्यानंतर त्याने स्वतःला गळफास लावला. आई आणि बहीण औषध घेऊन घरी परतल्यावर त्यांनी दार ठोठावले, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावले आणि मोहित लटकलेला आढळला. त्या छतावरून आत गेल्या. त्यानंतर दोघींनाही धक्का बसून विष प्राशन केलं. गावकऱ्यांनी सांगितलं की मोहितच्या मृत्यूनंतर आई कौशल्या देवी आणि बहीण सुप्रिया मृतदेहाजवळ बसल्या आणि रडू लागल्या. यानंतर, आई मोहितच्या मृतदेहाला चिकटून राहिली. ती म्हणू लागली, 'तू मला सोडून जाऊ शकत नाहीस, मला तुझं लग्न करायचं आहे.' ती मृतदेहापासून दूर जात नव्हती. गावकऱ्यांनी समजावत बाजूला केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT