MSc exam News Saam tv
देश विदेश

मोठी बातमी! परीक्षेच्या काही मिनिटांआधी MSc नर्सिंगची परीक्षा रद्द, अचानक नेमकं काय घडलं?

MSc exam News : जम्मू-काश्मीरच्या MSc नर्सिंगची परीक्षेबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. ही परीक्षा अचानक रद्द करण्यात आली आहे.

Saam Tv

नीट पेपरफुटीवरून राजकारण तापलं

नीट पेपरफुटीनंतर जम्मू-काश्मीरमधून धक्कादायक प्रकार उघड

परीक्षा सुरू करण्याआधी अचानक परीक्षा केली रद्द

देशात NEET परीक्षेचा मुद्दा गाजत आहे. नीट पेपरफुटीवरून शनिवारी कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोलन केलं आहे. या नीट पेपर फुटीप्रकरणानंतर जम्मू-काश्मीरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये MSC नर्सिंगची परीक्षा सुरू होण्याआधी काही मिनिटांपूर्वी रद्द करण्यात आली. उत्तर पत्रिकेत चुका झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

एमएससी नर्सिंग हा पोस्टग्रॅज्युएट कोर्स आहे. हा कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. जम्मू आणि काश्मीरमध्ये ही परीक्षा जम्मू आणि काश्मीर व्यावसायिक प्रवेश परीक्षा मंडळाकडून घेतली जाते. त्याच मंडळाने ही परीक्षा आयोजित केली होती. आज एकूण ५१३ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. यातील ४३८ विद्यार्थी काश्मीर विभागातील होते. तर १६५ विद्यार्थी जम्मू विभागातील होते.

प्रवेश परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका वेगवेगळी असते. जम्मू-काश्मीरमध्ये उत्तर पत्रिकेवर विद्यार्थ्यांचा फोटो देखील असतो. तसेच त्यात नाव, हजेरी क्रमांक नमूद करावा लागतो. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र्य उत्तरपत्रिका दिली जाते. जम्मू-काश्मीरमधील ही प्रवेश परीक्षा सुरू होण्याची उत्तर पत्रिकेचं कारण देऊन रद्द करण्यात आली. उत्तरपत्रिकेत चुका झाल्याचे सांगून परीक्षा रद्द करण्यात आली.

OMR उत्तरपत्रिका तपासण्याचा एक नियम आहे. ही तपासणी बड्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी आणि इतर साक्षीदाराची देखील गरज लागते. परंतु तपासणीत चुकीचा प्रकार आढळून आल्याने प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: हुल्लडबाज ट्रक ड्रायव्हरचा धोकादायक ओव्हरटेक, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक, राज्यसभेचा उमेदवार ठरणार?

कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी? तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

Akkalkot : अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेलाय? मग न विसरता फिरा 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT