Mr. Modi, Come listen to us - या खासदाराने व्हिडीओतून मोदींना केलं आवाहन Saam Tv News
देश विदेश

Mr. Modi, Come listen to us - या खासदाराने व्हिडीओतून मोदींना केलं आवाहन

तृणमुल कॉंग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी ''Mr. Modi, Come listen to us'' या शीर्षकांतर्गत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

१९ जुलैपासून सुरु झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन (parliament monsoon session 2021) काही दिवसांमध्ये संपणार आहे. मात्र संसदेत मुख्य विषयांवर चर्चा होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तृणमुल कॉंग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन (tmc mp derek o'brien) यांनी ''Mr. Modi, Come listen to us'' या शीर्षकांतर्गत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी पंतप्रधानांना (PM Modi) संसदेत येऊन विरोधकांचे म्हणने ऐकुन घेण्याचे साकडे घातले आहे. (Mr. Modi Come listen to us video by derek o'brien)

देशाच्या संसदेत सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पेगॅसस प्रकरण (pegasus), तीन कृषी कायदे (farmers bill), पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमती (petrol diesel price hike) अशा अनेक मुद्द्यांवर सरकारला संसदेत चर्चा हवी आहे. मात्र सरकार हे महत्वाचे विषय सोडून या मुद्दयांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी इतर मुद्द्यांवर लक्ष देत आहे. आमचे म्हणने ऐकुन घेत नाही आणि आम्हाला या विषयांवर बोलु दिले जात नाही. त्यामुळे आम्हाला या विषयांवर चर्चा हवी आहे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यासाठी तृणमुल कॉंग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आपल्या ट्विटरवरुन (twitter) हा तीन मिनीटांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हे देखील पहा -

या तीन मिनीटांच्या व्हिडिओत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी विरोधी पक्षांच्या भावना मांडल्या आहेत. यात काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा, आम आदमी पार्टीचे खासदार सुशीलपुमार गुप्ता, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर राय या सर्व खासदारांच्या भावना मांडल्या आहेत.

पेगॅसस हेरगिरी प्रकरण, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि इतर विषयांवर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या सभागृहात हजर राहावे, अशी विरोधी पक्षांची भावना आहे. त्यामुळे डेरेक ओब्रायन यांनी ‘मिस्टर मोदी, सभागृहात या, आमचे म्हणणे ऐकुन घ्या’ या शीर्षकाखाली व्हिडीओतून पंतप्रधानांना साकडे घातले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT