MP Election Saam Tv
देश विदेश

MP Election: EVM वर शंका? आमदारांना त्यांच्या गावात मिळाली फक्त ५० मते; काँग्रेसने नेत्याचे BJPवर गंभीर आरोप

MP Election: कमल नाथ यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. काही आमदारांना त्यांच्या गावातून ५० मतेही मिळाली नाहीत. तर काही आमदारांना फक्त ५० मते मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर दाखवण्यात आले होते.

Bharat Jadhav

Kamal Nath On MP Election Results 2023 :

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दिवस झाली आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. आपला पराभव का झाला याबाबत काँग्रेस पक्षामध्ये विचारमंथन चालू आहे. यासंदर्भात राज्यातील काँग्रेस नेत्यांनी बैठक बोलवली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कमल नाथ यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. (Latest News)

या पत्रकार परिषदेत कमल नाथ यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. काही आमदारांना त्यांच्या गावातून ५० मतेही मिळाली नाहीत. तर काही आमदारांना फक्त ५० मते मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात काय वातावरण होतं हे जनतेला माहिती होतं. परंतु आज सकाळी आलेल्या काही आमदारांनी सांगितलं की, त्यांना त्यांच्या गावातून फक्त ५० मते मिळाली. हे कसं शक्य आहे, असा सवाल कमल नाथ यांनी उपस्थित केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"एक्झिट पोल हे वातावरण तयार करण्यासाठी होते. ज्याला निकाल आधीच माहीत होता, त्यानेच एक्झिट पोल तयार केले असावेत," असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान आम्ही निवणुकांवर चर्चा करत आहोत. निकालाचं आत्मपरीक्षण केलं जात आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आधीची ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. ईव्हीएममध्ये छेडछाड केले जाऊ शकतात, असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. नोव्हेंबर १७ रोजी मध्यप्रदेशात मतदान झालं.

विधानसभेच्या २३० जागांसाठी मतदान झालं. या मतदानाचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाले, यात भाजपला विजय मिळाला. काँग्रेसला राज्यात फक्त ६६ जागा जिंकत्या आल्या. तर भाजपने तब्बल १६३ जागांवर विजय मिळवला. परंतु एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर दाखवण्यात आले होते. तर भाजप विरोधी बाकावर बसेल, असा निकाल देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

चार दिवस काम ३ दिवस सुट्टी; भारतात लागू होणार नवा नियम? कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल

परीक्षा देऊन विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली; रस्त्यात चालकाची नियत फिरली; निर्जनस्थळी अब्रू लुटली

Amaravati Accident : भयंकर! दरीत कोसळणाऱ्या बसला अडवताना विपरीत घडलं, चालकाचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT