Baby  Saam Tv
देश विदेश

Shocking News: रील बनवायचं वेड, आईने ८ महिन्यांचं बाळ विकलं; कारण ऐकून पोलिसही चक्रवले

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Shivani Tichkule

Crime News in Marathi: पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याला इन्स्टाग्राम रील्स बनवण्याच इतकं वेड लागलं होत की त्यांनी चक्क आपल्या 8 महिन्यांच्या बाळाला विकल्याची घटना घडली आहे. जोडप्याकडे पैसे नव्हते आणि त्यांना रील बनवण्यासाठी आयफोन 14 घ्यायचा होता, म्हणून त्यांनी स्वतःचं बाळ विकलं आहे. 

ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली असून बाळाचे वडील जयदेव फरार होते, पण त्यालाही अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही (Social Media) लोक या जोडप्यावर संताप व्यक्त करत आहेत. शेजाऱ्यांना बाळ न दिसल्याने त्यांनी बाळ कुठे आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दाम्पत्याच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून त्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी मुलाचा ठावठिकाणा विचारला असता, या दाम्पत्याने पैशाच्या बदल्यात मुलगा विकल्याचं कबूल केलं.

शेजाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई आणि वडिलांना अटक केली. खारदह परिसरातील एका महिलेकडून बाळाची सुटका करण्यात आली. या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला होता. याप्रकरणी प्रियंका नावाच्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News)

शेजाऱ्यांचा आरोप आहे की या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील अंमली पदार्थांचे सेवन करते. या जोडप्याला आपली मुलगीही विकायची होती. एका स्थानिक नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे त्यांच्या मुलीलाही विकणार होते. स्थानिक नगरसेवक तारक गुहा म्हणाले, "मुलाची विक्री केल्यानंतर जयदेवने शनिवारी मध्यरात्री मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केला. आम्हाला समजताच आम्ही पोलिसांना कळवले. पोलिसांनी जयदेवला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत शक्तीपीठ महामार्गावरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर सलग ३ वर्ष बलात्कार

Sharara Designs: लग्न किंवा पार्टीसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि सुंदर शरारा डिझाईन्स, तुम्ही दिसाल सगळ्यात फॅशनेबल

२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

Crime News: हळदीच्या दिवशी विपरित घडलं; दोन वधू बहिणींचा संशयास्पद मृत्यू; तांत्रिक कनेक्शनमुळे परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT