Andhra Pradesh Killing Case social media
देश विदेश

Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

mother kills son over illicit affair in andhra pradesh : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या मुलाची त्याच्या आईनेच हत्या केल्याचे उघड झाले. आरोपी महिलेने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केली. एसआयटी चौकशीत आईचा विकृत चेहरा जगासमोर आला.

Saam Tv

एखाद्या क्राइम थ्रीलर चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी धक्कादायक आणि पोलीस यंत्रणेला हादरवणारी घटना आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्याच पोटच्या मुलाला त्याच्या आईनं क्रूरपणे संपवलं. मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह गावच्या बाहेर स्मशानभूमीत पुरला. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. मात्र, एसआयटीच्या हाती एक पुरावा लागला आणि सैतान आईचा क्रूर चेहरा जगासमोर आला.

कर्नुल जिल्ह्याच्या आदोनी परिसरात हे धक्कादायक हत्याकांड घडलं. सुरुवातीला मुलगा बेपत्ता झाल्याचं भासवण्यात आलं. मात्र, चौकशीत हादरवणारं सत्य समोर आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, १५ वर्षीय विरेंद्रची हत्या त्याची आई गंगम्मानं प्रियकर दरगप्पाच्या मदतीने केली. आईच्या अनैतिक संबंधांना त्याचा विरोध होता. त्यामुळे घरात नेहमी खटके उडत होते.

विरेंद्रची आई गंगम्मा आणि दरगप्पा यांचे प्रेमसंबंध होते. विरेंद्र यावरून त्याच्या आईला नेहमी बोलायचा. विरेंद्रने या संबंधांची गावात सगळीकडे वाच्यता केली तर आपली बदनामी होईल, अशी भीती आईला होती. त्यामुळे तिने आणि प्रियकराने संगनमत करून त्याची हत्या केली. मृतदेह गावाच्या बाहेरील स्मशानभूमीजवळ पुरलं. हत्येनंतर कुणालाही संशय नको म्हणून तिने पोलिसांत जाऊन विरेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मुलाचा शोधही घेऊ लागली. इतकेच नाही तर तपासात विलंब होत असल्याचा आरोप करून ती हायकोर्टापर्यंत पोहोचली. कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात आला.

एसआयटी चौकशीत गंगम्मा आणि दरगप्पा यांच्या जबाबात विरोधभास आढळून आला. कॉल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे आणि स्थानिकांच्या जबाबावरून या दोघांवर संशय वाढला. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या हत्याकांडाचा खुलासा झाला. गावाच्या बाहेरील स्मशानभूमीजवळ पुरलेला मृतदेह पोलिसांनी महसूल विभाग, वैद्यकीय पथक आणि पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे अवशेष विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी दरगप्पाला ताब्यात घेतले. तर आईची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दाताच्या समस्यांवर तगडा उपाय! मीठ - पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज होईल कमी, असा करा वापर

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई न करण्याचे निर्देश कृषी विभागातर्फे देण्यात आले असताना शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू

Skin Fasting: एक दिवस करा फेस फास्टिंग, चेहरा होईल नॅचरली ग्लो, सगळ्याच्या नजरा तुमच्यावरच खिळतील

ठाणेकरांवर पाणीसंकट ? अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Jalgaon Tourism: माथेरान-महाबळेश्वरही पडेलं फिकं! जळगावपासून फक्त 284 किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

SCROLL FOR NEXT