saam tv
देश विदेश

एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेनं प्रवाशांची घाबरगुंडी उडाली; जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या अन् दुसऱ्या ट्रेनखाली आले

Udaipur Intercity Express Accident: उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यानंतर प्रवाशांनी गाडीतून खाली उड्या मारल्या. पण दुसऱ्या रुळावरून येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेस खाली आल्यानं अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Bharat Jadhav

  • उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

  • अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या.

  • दुसऱ्या रुळावरून येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेसखाली आल्याने अनेकांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशातील मोरेना येथे रेल्वे गाडीचा मोठा अपघात घडला आहे. 'उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस'मध्ये आग लागल्याची अफवा उडाली त्यानंतर प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. त्याचवेळी शेजारच्या रुळावरून येणाऱ्या 'पातालकोट एक्सप्रेस' खाली चिरडून अनेक प्रवासी बळी ठरले. या दुर्घटनेत सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मोरेना येथील हेतांपूर स्थानकावर घडल्याचे समजते आणि सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मोरेना येथील हेतामपूर स्थानकाजवळ घडला. उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस रविवारी (१४ जून) दुपारी ४ वाजता मोरेनाहून धोलपूरच्या दिशेने निघाली होती. हेतामपूर स्थानकावर गाडीला आग लागल्याची अफवा पसरली.

आगीची बातमी समजताच प्रवाशांमध्ये भीती पसरली त्यामुळे जीव वाचवण्यासाठी आणि भीतीपोटी अनेकांनी धावत्या गाडीतून खाली उड्या मारल्या आणि त्याच वेळी दुसऱ्या एका एक्स्प्रेसच्या खाली येत प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची बातमी मिळताच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आतापर्यंत तीन महिला आणि एका मुलाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

या दुर्घटनेत तीन महिला आणि एका मुलासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे (RPF) पथक घटनास्थळी दाखल झाले. आग लागल्याच्या अफवांमुळे प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले होते. पण त्याचवेळी शेजारच्या रुळावरून वेगाने येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेसची (गाडी क्रमांक २०४२४) धडक बसल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये आफरीन (३५), अशद (४), शकुंतला (६०) आणि वीरमा देवी (५८) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: कौतुक होणार; ५ राशींच्या व्यक्तींच्या पैशांच्या समस्या सुटणार, वाचा आजचे खास राशीभविष्य

सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का! महापालिकेतील नगरसेविकेचं पद जाणार? काय आहे कारण?

मित्राला वाचवताना दोघेही खदानीत बुडाले; तिघांच्या मृत्यूनं गावावर शोककळा

जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत, 5 दिवसांत 920 मिमी पावसानं वाढवलं टेन्शन? समुद्राची पातळी वाढणार, मुंबई बुडणार?

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT