MORADABAD CONGRESS COUNCILLOR SADDAM FOUND DEAD AT HOME saam tv
देश विदेश

काँग्रेसच्या नगरसेवकाचा घरात मृतदेह; आमदारांसह नेते-कार्यकर्ते दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Congress councillor Saddam Found Dead At Home In Moradabad: मुरादाबादमध्ये काँग्रेसचे नगरसेवक सद्दाम यांचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

काँग्रेसचे नगरसेवक सद्दाम यांनी रात्री सव्वा एकच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथे घडली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, स्थानिकांमध्ये त्यांच्या पत्नीशी झालेल्या वादानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. रात्री नगरसेवकाने गळफास घेतल्याची माहिती काँग्रेस नेत्यांना मिळताच तयांच्या घरी मोठी गर्दी जमा झाली. तरुण नगरसेवकाच्या मृत्यूची बातमी पसरताच परिसरात मोठी खळबळ उडाली.

सद्दाम हे मूळचे अमरोहा येथील रहिवासी असून ते अनेक वर्षांपासून मुरादाबादमध्ये राहत होते. मिळालेल्या महितीनुसार, रात्री एक वाजता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिकांच्या म्हणण्यांनुसार, त्यांचा पत्नीशी वाद झाला होता. तसेच टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी पत्नीला व्हिडिओ कॉल करून निरोप दिल्याचीही चर्चा आहे.

नगरसेवकाच्या मृत्यूची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार हाजी इकराम कुरेशी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. काँग्रेसचे महानगराध्यक्ष जुनैद इकराम उर्फ बंटी यांनीही घटनास्थळी पोहोचून कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, एसपी सिटी कुमार रणविजय सिंह यांनी सांगितले की, कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. फोनवरून काँग्रेस नगरसेवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

SCROLL FOR NEXT