Monsoon Update SAAM TV
देश विदेश

Monsoon: मान्सूनचा सुसाट प्रवास! महाराष्ट्रात वेळेआधीच धडकणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

Maharashtra Awaits Pre-Monsoon Rains: हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच राज्यात वेळेआधीच पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

मान्सूनने सध्या श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात, मालदीव आणि कोमोरीन भागातही त्याने प्रगती केली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झालं असून, अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मानसूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसाधारण वेळेआधीच मानसून पडणार आहे. गुरूवारी मानसूनने दक्षिण अरबी समुद्रासह, मालदिव -भारत आणि श्रीलंकेच्या नजीक असलेल्या कोमोरिन भाग आणि दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. त्यांनतर मानसूनने एक दिवस तिथेच मुक्काम केला. नंतर त्याने हळूहळू आगेकूच केली.

शनिवारी मानसूनने पुढे चाल करत दक्षिण अरबी समुद्रात, मालदीव, कोमोरिन भागात आणि बंगालच्या उपसागारातील काही भागात शिरकाव केला. तसेच मानसूनच्या ढगांनी अंदमान आणि निकोबार बेटाला पूर्ण व्यापलं. हवामान विभागाने पुढील २ दिवसांत मान्सून अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन आणि बंगालच्या उपसागरात आणखी भागांमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

या अनुषंगाने पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांमुळे गुरुवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच, ४० ते ६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT