Monsoon 2024 Update Saam TV
देश विदेश

Monsoon 2024 Update: गुड न्यूज! मान्सून २४ तासांत केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात कधी येणार?

Monsoon 2024: देशातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Priya More

वाढते तापमान आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांमध्ये मान्सून (Monsoon 2024) केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (Weather Department) मान्सूनबाबत ही महत्वाची अपडेट दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रचंड आनंद झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने (Indian Metrological Department Mumbai) नुकताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मान्सून केरळात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मान्सून दाखल होण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळात दाखल झाल्यानंतर पुढील १० ते ११ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे.

सध्या मुंबईत उष्ण वारे वाहत असून विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विदर्भातील तापमान कमी होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा देशामध्ये १०६ मिलिमीटर इतका पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना आनंद झाला आहे. कारण उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक मान्सूनची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत.

मान्सून वेळेआधी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता मान्सून २४ तासांच केरळमध्ये दाखल होणार असल्याची बातमी ऐकून सर्वांनाच आनंद झाला आहे. आता लवकरच नागरिकांची उकाड्यातून सुटका होणार आहे. मान्सून अंदमानामध्ये दाखल झाला असून आता तो २४ तासांमध्ये केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर हळूहळू पुढे सरकत १० ते ११ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. मुंबईमध्ये मान्सून १० ते ११ जूनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयेशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

SCROLL FOR NEXT