Monkeypox Virus  Saam TV
देश विदेश

Monkeypox Vaccine : मंकीपॉक्सवरील पहिल्या लसीला WHOची मान्यता; भयंकर रोगाचा कोणाला अधिक धोका? पाहा व्हिडिओ

Monkeypox Vaccine : मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी. मंकीपॉक्सला रोखणं शक्य होणाराय. मंकीपॉक्सवर आता लस आलीय. कोरोनानंतर मंकीपॉक्सने जगभरात थैमान घातलंय. त्यामुळे ही लस वरदान ठरणाराय. मंकीपॉक्सला रोखणारी कोणती आहे ही लस? पाहुयात हा रिपोर्ट

Vishal Gangurde

संदिप चव्हाण, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मंकीपॉक्सने जगभरात थैमान घातलं असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आलीय. मंकीपॉक्सवर लस आलीय. MVA-BN नावाच्या लसीला WHO नं मंजुरी दिलीय. त्यामुळे आता मंकीपॉक्सचा धोका कमी होण्याची शक्यताय. मात्र, असं असलं तरी 18 वर्षाखालील मुलं, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांना मंकीपॉक्सचा धोका कायमच आहे. ही लस किती प्रभावी आहे पाहुयात

मंकीपॉक्सवर लस आली

MVA-BN असं या लसीचं नाव आहे. दोन-डोस इंजेक्शन म्हणून चार आठवड्यांच्या अंतराने दिली जाणार आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस उपलब्ध आहे. लसीचे 2 डोस 82% प्रभावी असल्याची माहिती आहे.

मंकीपॉक्सने आफ्रिकेत हाहाकार माजवलाय. आता भारतातही मंकीपॉक्सचा रुग्ण सापडलाय. त्यामुळे मंकीपॉक्सचा धोका भारतालाही आहे. यासाठीच भारत सतर्क झालाय. मात्र, आफ्रिका, बांग्लादेश आणि पाकिस्तानात मंकीपॉक्सने धुमाकूळ घातल्याने तिथे लोकांचा बळीही जातोय. त्यामुळे ही लस वरदान ठरणाराय. मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास मंकीपॉक्सला वेळीच रोखण्यात यश येईल.

आता मंकीपॉक्सवर आली लस

काँगोमध्ये 70 टक्के रुग्ण हे 15 वर्षाखालील आहेत. त्यामुळे WHO ने लहान मुलांसाठी लवकरच लस बनवण्याचे निर्देश दिलेयत. सध्या ही लस GAVI वॅक्सिन अलायन्स आणि युनिसेफ खरेदी करू शकतात. तसंच भारतात सिरम इन्स्टिट्युटही मंकीपॉक्सवर लस तयार करतेय. त्यामुळे भारतीयांसाठी ही बातमी दिलासादायक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT