Monkeypox Update
Monkeypox Update  SAAM TV
देश विदेश

Monkeypox Update : भारतातील पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाबाबत आली मोठी अपडेट

Nandkumar Joshi

तिरुवअनंतपुरम: देशातील पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारतात पहिलाच मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला होता. तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्याला लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येईल, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. (India first monkeypox patient recovers)

केरळमधील मूळ रहिवासी असलेली ३५ वर्षीय व्यक्ती १२ जुलै रोजी संयुक्त अरब अमिरात (UAE) येथून आला होता. दोन दिवसानंतर चाचणी केली. त्यात त्याला मंकीपॉक्सचा (Monkeypox) संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला कोल्लमच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्या रुग्णाला त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

मंकीपॉक्सचा देशातील हा पहिला रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. याबाबत आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी माहिती दिली. पूर्ण उपचार प्रोटोकॉलचे नियोजन पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीकडून करण्यात आले होते. वारंवार नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आणि तपासणी करण्यात आली. आतापर्यंत सर्व नमुन्यांचे दोनदा परीक्षण करण्यात आले आणि ते निगेटिव्ह आले आहेत. रुग्ण (Patient) पूर्णपणे बरा झाला आहे. त्याची प्रकृती ठीक आहे.

सुरुवातीला या रुग्णासोबत आलेले त्याचे आईवडील आणि त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या ११ अन्य प्रवासी संपर्कात असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व शंका दूर करतानाच, सर्व संपर्कात आलेल्या अन्य प्रवासी निरीक्षणाखाली होते, असे सांगितले.

राज्यात अन्य दोन पॉझिटिव्ह रुग्णही आढळले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची प्रकृती सुधारते आहे, असेही वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

एका दिवसाआधीच सरकारने शुक्रवारी सांगितले होते की, देशात २७ जुलैपर्यंत मंकीपॉक्सचे एकूण चार रुग्ण आढळले आहेत. त्यातील तीन रुग्ण हे केरळचे आणि एक रुग्ण दिल्लीतला असल्याचे सांगितले होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, देशात मंकीपॉक्समुळे एकही मृत्यू झालेला नाही. देशातील काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मे महिन्यापासून कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT