Cobra Snake vs Mongoose Fight Video :  Saam TV
देश विदेश

Cobra Snake vs Mongoose : मुंगूस आणि कोब्रामध्ये घमासान युद्ध; कोण जिंकलं? पाहा VIDEO

व्हिडिओत मुंगूस आणि कोब्रा यांच्यात धमासान युद्ध सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

Cobra Snake vs Mongoose Fight Video : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ असं मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मजेशीर असतात तर काही व्हिडिओ हे थरारक असतात. अशातच सोशल मीडियावर (Social Media) मुंगूस आणि कोब्रा यांच्यातील घमासान युद्धाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत मुंगूस आणि कोब्रा यांच्यात थरारक युद्ध सुरू आहे. (Snake vs Mongoose Fight Video)

मुंगूस आणि साप हे एकमेकांचे कायम शत्रू मानले जातात. दोघांनीही एकमेकांना पाहिलं तर, त्यांच्या संतापाचा पार चढतो. बहुतेक वेळा मुंगसाला बघताच साप आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुंगूस काही सापाला सोडत नाही. हा व्हिडिओ जुना असला तरी, आता नव्याने तो व्हायरल (Viral Video) झाला असून लाखो लोकांनी बघितला आहे.

मुंगूस आणि सापामध्ये घमासान युद्ध

एका युटूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ जवळपास दोन मिनिटांचा असून, व्हिडिओत मुंगूस आणि कोब्रा यांच्या घमासान युद्ध सुरू आहे. या युद्धात नेमकं कोण जिंकणार? याचीच उत्सुकता नेटकऱ्यांना लागली. व्हिडिओ जर बारकाईने बघितला तरक सुरूवातीला कोब्रा मुंगसावर हल्ला करतो. (Snake vs Mongoose Fight Video)

मात्र, कोब्राचे वार मुंगूस मोठ्या चपळाने वाचवतो. मुंगसाने हल्ला केल्यानंतर कोब्रा काही वेळ प्रतिकार करतो, मात्र मुंगसाच्या तावडीतून त्याला सुटणे अशक्य होतं. मुंगसाच्या हल्ल्याने आता आपला कार्यक्रम झाला आहे, हे कोब्राच्या लक्षात आल्यानंतर, कोब्रा देखील आपली हार मानतो. आणि काही वेळाने मुंगूस कोब्राला ठार करून आपल्या गुहेत घेऊन जाताना पाहायला मिळते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT