Pm Modi and Amit Shah Saam Tv
देश विदेश

PM Modi : मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा; मोदी मंत्रिमंडळात खळबळ

George Kurian Resignation : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे.

Namdeo Kumbhar

Modi Cabinet Reshuffle : भाजपाचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेचा ६ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम ७५ (२) अंतर्गत कुरियन यांचा राजीनामा मंजूर केला आहे. २०२४ मध्ये भाजपच्या ख्रिश्चन समुदायापर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार जॉर्ज कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. या राजीनाम्यानंतर मोदी सरकारमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चांना जोर चढला आहे.

जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांचा सहा वर्षांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला होता. भाजपने त्यांना पुन्हा न निवडण्याचा निर्णय घेतला आहे. ६५ वर्षीय जॉर्ज कुरियन हे ऑगस्ट २०२४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ते भाजपचे एक प्रमुख नेते असून १९८० मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सदस्य आहेत.

जॉर्ज कुरियन कोण आहेत?

जॉर्ज कुरियन हे फक्त राजकीय नेतेच नाहीत. त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणूनही काम केले आहे. जॉर्ज कुरियन यांचा जन्म २० सप्टेंबर १९६० रोजी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एट्टुमानूर नगरपालिकेच्या नंबियाकुलम येथे झाला. त्यांनी आपल्या मूळ गावी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर कायद्यामध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. कुरियन यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही.

९ जून २०२४ रोजी जॉर्ज कुरियन यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ११ जून २०२४ रोजी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. याआधी जॉर्ज कुरियन यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष आणि तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री ओ. राजगोपाल यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून काम पाहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हिंगोलीमध्ये दाखल

Smart Meter : अचानक वीज बिल दुप्पट-तिप्पट, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना जोरदार 'शॉक', राज्यात संतापाचे वातावरण

Shocking : नाशिक हादरलं! विवाहित पुरुषाचं अल्पवयीन मुलीसोबत अमानुष कृत्य, वारंवार अत्याचार; गर्भवती राहताच...

कचरा म्हणून फेकून देऊ नका! 'आरोग्याचा खजिना' आहेत फणसाच्या बिया; 'हे' ५ फायदे तुमच्यासाठी उपयोगी

Maharashtra Fort : ट्रेकिंगची आवड आहे? मग पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'हे' गड-किल्ले नक्की फिरा

SCROLL FOR NEXT