India fuel crisis  Saam tv
देश विदेश

भारतात मोठं काही तरी घडणार? सरकारकडून बँकांना 'लॉकडाऊन सारखे' आदेश

India fuel crisis : मोदी सरकारने बँकांना 'लॉकडाऊन सारखे' आदेश दिले आहेत. 'लॉकडाऊन सारख्या' आदेशानंतर चर्चांना उधाण आलं आहे

Vishal Gangurde

भारतात इंधनाच्या दरात वाढ

तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बँकांना महत्वाचे आदेश

सरकारने संस्थांना दिले महत्वाचे निर्देश

देशात मागील काही दिवसांत पेट्रोल-डिझेल, सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर आता अर्थ मंत्रालयाने सरकारी बँका, विमा कंपनी आणि इतर खासगी संस्थांना खर्च कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सरकारने आदेश देत खर्च कमी करण्यासं सांगितलं आहे. अधिकाऱ्यांना विदेश यात्रा कमी करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फेरन्सचा अधिक उपयोग करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करण्यास सांगितलं आहे. सरकारचा आदेश हा स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, भारतीय जीवन विमा महामंडळासहित इतर खासगी संस्थांना निर्देश लागू असणार आहे.

सरकारने खर्चात कपात करण्यासाठी सर्व बैठक, कामाचं परीक्षण, सूचना सुचवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका आयोजित करण्यास सांगितल्या आहेत. सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर अधिक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या आदेशात म्हटलं की, 'हेडक्वार्टर आणि ब्रँचने करार केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या ऐवजी आता इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करत अधिकाऱ्यांना देशातील नागरिकांना कोरोना काळातील उपाय योजना सूचवल्या आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्यास सांगितल्या आहेत. देशहितासाठी निर्णय घ्या, असं आवाहन मोदींनी केलं.

'कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालीये. जागतिक अस्थिरतेमुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर दबाव येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. होर्मुझची सामुद्रधुनी आणि तेल आयातीवरील अडथळे यामुळे भारताची चिंता वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

Maharashtra News Live Update: अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

SCROLL FOR NEXT