मोदी सरकार विरोधात हुंकार; शेतकऱ्यांचा पुन्हा भारत बंद
मोदी सरकार विरोधात हुंकार; शेतकऱ्यांचा पुन्हा भारत बंद Saam Tv
देश विदेश

मोदी सरकार विरोधात हुंकार; शेतकऱ्यांचा पुन्हा भारत बंद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या Central Government तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी Farmer संघटनांनी आज पासून भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेस Congress , आम आदमी पार्टीसह विरोधी पक्षांनी दहा तासांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सुमारे 40 शेतकरी संघटनांचा समावेश असलेल्या संयुक्त किसान मोर्चानेही भारत बंद पुकारला आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, टीडीपी, बसपा, डावे दल, स्वराज इंडिया इत्यादींनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. 

हे देखील पहा -

काँग्रेसच्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेस आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. पंजाब सरकारने देखील शेतकऱ्यांच्या या बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनास १० महिने पूर्ण झाल्यानंतर देखील मोदी सरकारकडून पुन्हा चर्चेची तयारी दाखवली गेली नाही त्यामुळे या आंदोलनात सहभागी ४० शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी असून शेतकरी आता “आर या पार”च्या पवित्र्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

आजच्या या बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आंदोलकांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे. गेल्या १० महिन्यांपासून आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने संपूर्ण देशाला हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 6 पासून या भारत बंदला सुरुवात झाली असून संध्याकाळी 4 पर्यंत हे चालू राहणार आहे. मात्र या भारत बंदमध्ये रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, मदत आणि बचाव कार्यासह सर्व अत्यावश्यक सेवा आणि परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना या भारत बंदमधून सूट देण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

SCROLL FOR NEXT