Modi Cabinet Formation Saam Tv
देश विदेश

Modi Cabinet Formation: NDA सरकारचे खातेवाटप जाहीर, ३ मुद्द्यांमधून समजून घ्या

Priya More, Pramod Subhash Jagtap

प्रमोद जगताप, दिल्ली

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. शपथविधी सोहळ्यानंतर एनडीएच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास व्यक्त केला. अशामध्ये एनडीए सरकारच्या ७१ मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. नुकताच मंत्र्यांना हे खातं वाटप करण्यात आले आहेत. एनडीए सरकारमध्ये कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं देण्यात आले आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयांचे वाटप करण्यात आले. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय तर अमित शहा यांच्याकडे दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा रेल्वे मंत्रालय देण्यात आले आहे. मात्र यावेळी त्यांच्याकडे माहिती प्रसारण मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

त्याचवेळी, मोदी 2.0 प्रमाणे एस जयशंकर यांना मोदी 3.0 मध्ये देखील परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर निर्मला सितारमण यांच्याकडे पुन्हा अर्थमंत्री पद देण्यात आले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टर्म सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत पहिली कॅबिनेट बैठक घेतली. ज्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले.

कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं -

अमित शहा - गृह मंत्री

राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री

नितीन गडकरी- रस्ते वाहतूक मंत्री

अश्विनी वैष्णव- रेल्वे मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्री

एस जयशंकर- परराष्ट्र मंत्री

मनोहरलाल खट्टर - ऊर्जा मंत्री

श्रीपाद नाईक - शहरी विकास - राज्यमंत्री

शिवराज सिंह चौहान - कृषी मंत्री

निर्मला सितारमण - अर्थ मंत्री

जीतन राम मांझी - केंद्रीय लघु उद्योग मंत्री

पियूष गोयल - वाणिज्य मंत्री

भूपेंद्र यादव - पर्यावरण मंत्री

चिराग पासवान - क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री

धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री

ज्योतिरादित्य शिंदे - दूरसंचार मंत्री

जे. पी नड्डा - आरोग्य मंत्री

हरदीप पुरी - पेट्रोलियम मंत्री

अजय टमटा- रस्ते वाहतूक - राज्यमंत्री

हर्ष मल्होत्रा- रस्ते वाहतूक - राज्यमंत्री

प्रतापराव जाधव - आयुष, आरोग्य आणि कुटुंब नियोजन - राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार

रामदास आठवले - सामाजिक न्याय मंत्रालय - राज्यमंत्री

अन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास मंत्री

मुरलीधर मोहोळ - सहकार आणि नागरी उड्डाण - राज्यमंत्री

रक्षा खडसे - क्रीडा आणि युवक कल्याण - राज्यमंत्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT