Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा  AI
देश विदेश

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

Cyber Crime News : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक जाहिरात आली. ती खूप आवडली. म्हणून क्लिक केली तर, बँक खात्यातून खटाखट पैसे उडाले. तुम्हालाही मोठा फटका बसू शकतो. त्याआधी हा स्कॅम नेमका कसा होतो, जाणून घ्या...

Saam Tv

जाहिरात की खात्यातून पैसे काढून घेण्यासाठीचा ट्रॅप?...जाहिरात आवडली म्हणून क्लिक केले अन् खात्यातून काही क्षणांतच हजारो रूपये गायब झाले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील जोडप्याला जाहिरातीची भुरळ पडली आणि त्या मोहापायी त्यावर क्लिक करणं त्यांच्या चांगलंच अंगाशी आलं. 11 ऑगस्टला हा प्रकार घडला. जाहिरातीवर क्लिक केल्यामुळे एकाच्या बँक अकाउंटमधून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 98 हजार रुपये गायब झाले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ग्वाल्हेर येथील रूद्र पुरा येथे राहणाऱ्या जयप्रताप सिंग बाथम याची पत्नी नेहमीप्रमाणे जयप्रतापच्या मोबाइलवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स बघत होती. रिल्स बघताना मध्येच एक जाहिरात आली. जाहिरात आवडली म्हणून बायकोने त्या जाहिरातीवर क्लिक केले. अन् रात्रभरात नवऱ्याच्या बँक खात्यातून 98 हजार रूपये गायब झाले.

जाहिरातीवर क्लिक केल्यावर मोबाइल अचानक हँग झाला. सगळे फंक्शन एकाच वेळी काम करणे बंद झाले. मोबाइल अचानक स्विच्ड ऑफ होऊन बंद झाला. सुरूवातीला जास्त रिल्स बघितल्यामुळे किंवा फोनमधे बिघाड असल्यामुळे फोन हँग झाला असावा असे त्या दोघांनाही वाटले. नंतर फोन रिपेअर केल्यावर सुरू देखील झाला. त्यानंतर अचानक रात्री बारा वाजता अकाउंटमधून 2970 रूपये कट झाले. बाथम दाम्पत्यानं दुसऱ्या दिवशी सायबर हेल्पलाइन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवली. बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले अन् ते बघून जोडप्याच्या पायाखालची जमीन सरकली. एका रात्रीत यूपीआय पेंमेंटच्या मदतीने खात्यातून तब्बल तीन वेळा प्रयत्न करून 98,000 रूपये काढण्यात आले.

या प्रकरणी या दोघांनी पुरानी छावणी या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास सायबर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT