Surat News Saam Tv
देश विदेश

Surat News: चमत्कार! गणपती बाप्पानं वाचवला १३ वर्षीय मुलाचा जीव; समुद्रात वाहून गेलेला मुलगा 24 तासांनंतर जिवंत सापडला

Ganeshotsav 2023: गणपती विसर्जनावेळी बुडालेला मुलगा तब्बल २४ तासानंतर जिवंत सापडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Surat Ganeshotsav News :

देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. गणपती विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात धामधूम पाहायला मिळाली. यावेळी अनेक ठिकाणी दुर्घटना समोर आल्या. गणपती विसर्जनावेळी पाण्यात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या. मात्र एका घटनेत एक १३ वर्षीय मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे. गणपती विसर्जनावेळी बुडालेला मुलगा तब्बल २४ तासानंतर जिवंत सापडला आहे. सुरतमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये एक १३ वर्षीय मुलगा शनिवारी दुपारी अरबी समुद्रात जिवंत सापडला आहे. दुमास येथे बाप्पाच्या विसर्जनावेळी हा मुलगा भरतीच्या पाण्यात वाहून गेला होता. २४ तासाहून अधिक काळ समुद्रात असलेला मुलगा जिवंत सापडल्याने सगळेच चकीत झाले आहेत. लखन देवीपूजक असे मुलाचे नाव आहे. एका मच्छीमाराला हा मुलगा सापडला आहे.

रसिक तांडेल हा मच्छीमार समुद्रात गेला त्यावेळी त्याला हा मुलगा दिसला. रसिक मासेमारीसाठी समुद्रात गेला त्यावेळी लखन त्याला एका मोठ्या प्लायवूडवर तरंगताना दिसला. त्याने गणेशमूर्तीचा आधार घेतला होता. मूर्तीचा आधारे तो मुलगा तरंगत होता. बाप्पाच्या मूर्तीमुळे तो बचावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मच्छिमाराला समुद्रात एक तरंगता प्लायवूड लांबून दिसला. त्याला संशय आल्याने त्याने बोट जवळ नेऊन पाहिले, तर एक मुलगा त्याचा आधार घेत तरंगत होता. हे पाहून त्याला धक्काच बसला'.

गणपती विसर्जनावेळी मुलगा आपल्या कुटुंबियासोबत दुमास येथे गेला होता. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबियानी तो हरवल्याची तक्रार दुमास पोलिसात दाखल केली होती. मात्र आपला मुलगा आता सुखरुप घरी पोहोचल्याने कुटुंबियांना आनंद झाला आहे. बाप्पा मच्छिमार रसिक तांडेलच्या रुपाने आला अन् मुलाला वाचवले अशी चर्चा आता परिसरातील सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

SCROLL FOR NEXT