Iran has reportedly placed three conditions before the United States to stop the ongoing Gulf conflict saam tv
देश विदेश

Iran-US War: आखातातील युद्ध थांबणार? इराणच्या 3 अटी अमेरिकेला मान्य?

Iran Offers Ceasefire Formula: इराणनं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेपुढे 3 अटी ठेवलेत. मात्र या तीन अटी अमेरिकेला मान्य होणार का? आखाती देशांमधील युद्ध थांबणार की आणखी भडकणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Snehil Shivaji

गेल्या 12 दिवसांपासून आखातात सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम आता जगात दिसायला सुरुवात झालीये. एकीकडे अमेरिका इराणला गुडघ्यावर आणल्याचे लाख दावे करत असली तरी शेवटचा सैनिक असेपर्यंत शस्त्र खाली ठेवणार नाही असा निर्धार केलेल्या इराणनं आता युद्ध थांबवायचं असेल तर एक फॉर्म्युला ठेवलाय. युद्ध थांबवायचं असेल तर 3 अटी मान्य करण्याचा अल्टीमेटम इराणनं दिला. जगात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी या अटी नेमक्या कोणत्या आहेत पाहा.

इराणच्या सार्वभौमत्वाला, कायदेशीर हक्कांना विशेषतः अणू ऊर्जा आणि संरक्षण अधिकारांना मान्यता मिळावी तसंच या युद्धात अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जे काही नुकसान झालं, त्याची पूर्ण भरपाई देण्यात यावी. तर भविष्यात इराणवर पुन्हा कधीही लष्करी आक्रमण करणार नाही, याची लेखी आणि ठाम आंतरराष्ट्रीय हमी देण्यात यावी.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या अटी जागतिक व्यासपीठासमोर मांडून आता चेंडू थेट व्हाईट हाऊसच्या कोर्टात टोलवलाय. आता निर्णय अमेरिका आणि इस्रायलला घ्यायचा आहे. १२ दिवस उलटलेत, हजारो निष्पापांचा बळी गेलाय आणि लाखो कुटुंबं उद्ध्वस्त झालीत. जागतिक अर्थव्यवस्थेचा कणाही या युद्धानं मोडलाय. त्यामुळे आता जगाची भावना एकच आहे, युद्ध थांबवा. पण अमेरिकेला इराणच्या या अटी मान्य होतील का? की अहंकारामुळे आखातातील हे युद्ध जागतिक महायुद्धाच्या दिशेनं वळतं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics : काँग्रेस पक्षात मानापमान नाट्य, अध्यक्षपदावरून नेत्यांमध्ये नाराजी

Army Cheetah Helicopter Crash: मोठी बातमी! लडाखमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; डोंगराला धडकलं चीता हेलिकॉप्टर

Maharashtra News Live Update: नागपुरात उष्णतेचा वाढता कहर, वेगवेगळ्या कारणाने ७ दिवसांत १८० मृत्यूंची नोंद, काहींचा उष्माघाताने मृत्यू

Vidhan Parishad Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच; विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपची कोंडी

भीमाशंकर कुणाचं? खेड की आंबेगावचं? राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जुंपली

SCROLL FOR NEXT