Big decision of the government in the wake of gas price hike; LPG cylinder booking period extended to 25 days. saam tv
देश विदेश

LPG Cylinder: पश्चिम-आशियाच्या युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम; दरवाढीदरम्यान सरकारचा LPG सिलिंडरबाबत मोठा निर्णय

Big Decision on LPG Cylinders: पश्चिम-आशिया (मध्य पूर्वे)तील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलिंडर (एलपीजी) साठी बुकिंग कालावधी वाढवला आहे. हा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • एलपीजी सिलिंडर बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवला.

  • काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा निर्णय.

  • मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता.

LPG च्या किमतीत वाढ होत असताना केंद्र सरकारनं LPG सिलिंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलिंडर (एलपीजी) साठी बुकिंग कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला असून यातून काळाबाजार रोखला जाणार आहे.

मंत्रालयाने एलपीजी सिलिंडर बुकिंगचा कालावधी फक्त तीन दिवसांपूर्वीच १५ दिवसांवरून २१ दिवसांपर्यंत वाढवला होता, परंतु आता तो २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आलाय. याचा अर्थ ग्राहकांना आता दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २४ दिवसांचे अंतर राखावे लागणार आहे.

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दोन दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑयल कॉरपोरेशनच्या वेबसाइट अनुसार, दिल्लीमध्ये गैर-सब्सिडीवाल्यांना १४.२ किलोग्राम चा सिलिंडर आता ९१३ रुपयांना मिळणार आहे. या सिलिंडरची किंमत ८५३ रुपये होती.

वर्षभरात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ ७ मार्चपासून लागू झाली आहे. मागील वाढ गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ५० रुपयांची होती. आयओसीच्या वेबसाइटनुसार, विनाअनुदानित एलपीजीची किंमत आता मुंबईत ९१२.५० रुपये, कोलकातामध्ये ९३९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९२८.५० रुपये आहे.

तर उज्ज्वला योजनेचे लाभार्थ्यांना म्हणजेच २०१६ मध्ये योजना सुरू झाल्यापासून मोफत एलपीजी कनेक्शन घेतलेल्या १० कोटींहून अधिक गरीब लोकांना वर्षातून १२ वेळा प्रत्येक १४.२ किलो सिलिंडरवर ३०० रुपयांचे अनुदान मिळत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :नालासोपारात पिसाटलेल्या रेड्याचा धुमाकूळ; दुचाकीला धडक देत दुकानात घुसला

Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांचा वाद पुन्हा चिघळला; उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली मोठी मागणी

Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची? स्वामीनारायण मंदिरात आढळले दोन तरुणींचे मृतदेह

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

Kolhapur Tourism : रोड ट्रिपसाठी 'हे' आहे महाराष्ट्रातील सुंदर ठिकाण, कोल्हापूर ते कोकण प्रवास आयुष्यभर स्मरणात राहील

SCROLL FOR NEXT