META ADMITS ACCIDENTAL REMOVAL OF PM MODI'S VIRAL VIDEO, RESTORES IT AFTER TECHNICAL ERROR Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा 'तो' व्हिडिओ काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावरून हटवला; मेटाकडून स्पष्टीकरण

PM Narendra Modi Video Delete Meta : मेटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील व्हायरल व्हिडिओ तांत्रिक त्रुटीमुळे चुकून हटवल्याची कबुली दिली आहे. कंपनीने चूक दुरुस्त करून व्हिडिओ पुन्हा उपलब्ध केला असून या घटनेची देशभर चर्चा सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मेटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवल्याचे मान्य केले

  • संबंधित चूक लक्षात येताच कंपनीने तातडीने कारवाई केली

  • व्हिडिओ काही काळ भारतात पाहता येत नसल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा

महाराष्ट्रातील नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे ३६ दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला शांत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत विद्यार्थ्यांना आवाहन केलं होत. त्यानंतर मोदींचे हे व्हिडिओ Gen Z साठी कंटेन्ट तयार झाला. या व्हिडिओंची देशभर चर्चा सुरु असतानाच एक व्हिडिओ मेटाकडून डिलीट करण्यात आला होता. यावर मेटाने ते चुकून झाल्याचा दावा केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेला एक महत्त्वाचा व्हिडिओ काही काळासाठी भारतात पाहता येत नसल्याने मोठी चर्चा रंगली. मोदींनी हा व्हिडिओ तरुणाईसाठी बनवला होता. हा व्हिडिओ रात्रीच्या सुमारास अपलोड केल्यानंतर, मध्यरात्री १.२५ वाजताच्या सुमारास अनेक युजर्सनी व्हिडिओ उघडण्याचा प्रयत्न केला असता, " हा व्हिडिओ भारतात उपलब्ध नाही," असा मेसेज यूजर्सना फेसबुकवर दिसत होता. त्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि हा व्हिडिओ डिलीट का केला? या बाबात प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र मेटाकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नसल्याने युजर्समध्ये नाराजी निर्माण झाली होती. अखेर मेटाने यावर उत्तर दिले असून त्यांनी चूक मान्य केली आहे.

त्यावर मेटाने प्रतिक्रिया देत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ तांत्रिक कारणामुळे चुकून प्रतिबंधित करण्यात आला होता. ही चूक लक्षात येताच संबंधित कारवाई तातडीने दुरुस्त करण्यात आली असून व्हिडिओ पुन्हा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यावर मेटाने प्रतिक्रिया देत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ तांत्रिक कारणामुळे चुकून डीलीट करण्यात आला होता. ही चूक लक्षात येताच तातडीने दुरुस्त करण्यात आली असून व्हिडिओ पुन्हा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मेटाच्या या स्पष्टीकरणानंतर वाद काही प्रमाणात निवळला असला, तरी एवढ्या महत्त्वाच्या अधिकृत पोस्टवर अशी चूक कशी घडली, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील आरोपीला जामीन

Fasting Tips : श्रावणात उपवासाला कॉफी प्यावी की नाही? जाणून घ्या 'या' ६ टिप्स

Pune : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणांत ६.७५ टीएमसी पाण्याची आवक

सोसायट्यांसाठी मोठी बातमी! पार्किंग, EV चार्जिंगसाठी लागू होणार नवे नियम

उज्जैनच्या मंदिरात चेंगराचेंगरीची स्थिती; नागचंद्रेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT