Matrimonial frauds In Hyderabad
Matrimonial frauds In Hyderabad Saam TV
देश विदेश

४ वर्षांत १३ लग्न! पती नसलेल्या श्रीमंत महिलांना करायचा लक्ष्य; पाहा कसा झाला पर्दाफाश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हैदराबाद, आंध्र प्रदेश: एकाच पुरुषाने तब्बल १३ महिलांशी विवाह (Marriage) करत त्यांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये उघडकीस आला आहे. दोन तेलुगू राज्यांमध्ये गेल्या चार वर्षांत तब्बल १३ महिलांशी विवाह करणाऱ्या एका आरोपीला सायबराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अडापा शिवशंकर बाबू असं या ३५ वर्षीय आरोपीचं नाव असून तो घटस्फोटित महिलांना लग्नाचे आमिष दाखवायचा, मग त्यांच्याकडून पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायचा. अशाचप्रकारे त्याने आणखी एका महिलेची फसवणुक केली, पण यावेळी त्याचं पितळ उघडं पडलं. (Hyderabad Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील 35 वर्षीय आरोपी अडापा बाबू हा मॅट्रीमोनी साईटवर (Matrimony Site) घटस्फोट झालेल्याने नवा जोडीदार शोधत असलेल्या श्रीमंत महिलांना लक्ष्य करत होता. यासाठी तो घटस्फोटाची बनावट कागदपत्रे तयार करायता. या महिलांना तो, नवीन आणि चांगले आयुष्य देण्याचे आश्वासन द्यायचा. सायबराबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत गचीबोवली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हैदराबाद, राचकोंडा, संगारेड्डी, गुंटूर, येथे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती दिली. मात्र यावेळी त्याचा पर्दाफाश झाला.

पीडितेच्या तक्रारीने भांडाफोड

शिवशंकर बाबूने एका महिलेचा विश्वास जिंकला आणि तिच्याशी विवाह केला. यानंतर त्याने तिच्याकडून २५ लाख रुपये रोख आणि ७ लाख रुपये किमतीचे सोने घेतले. ही रक्कम आणि सोने परत केले नसल्याची तक्रार एका पीडितेने रामचंद्रपुरम पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर एका आठवड्यानंतर त्याला अटक झाली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 420 अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेने पत्रकार परिषदेत सांगितले होते की बाबू तिच्याशी २०२१ मध्ये मॅट्रिमोनी साइटद्वारे संपर्कात आला होता. त्याने तिला सांगितले की त्याचे आई-वडील फार पूर्वीच मरण पावले आहेत आणि तो एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. तसेच आपल्याला महिन्याला २ लाख रुपये पगार असल्याचं त्याने त्यानं तिला सांगितलं. सोबतच तो घटस्फोटित आहे आणि एका चांगल्या पार्टनरच्या शोधत असल्याचं सांगितलं.

अन् तो विवाहीत असल्याचं कळलं

शिवशंकर बाबू याची ओळख पटल्यानंतर तिच्या पालकांनी तिचे लग्न बाबूशी लावून दिले. तिला अमेरिकेत नेण्याच्या बहाण्याने त्याने तिच्या पालकांकडून जवळपास 25 लाख रुपये घेतले. तो अमेरिकेत जाण्याची चिन्हे दिसत नसल्याने तिच्या पालकांनी त्याला पैसे परत करण्यास सांगितले. बाबू तिला आणि तिच्या आई-वडिलांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर तिने याबाबत रामचंद्रपुरम पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी बाबूला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले असता, तो आधीच विवाहित असल्याचे समजल्यावर तिला धक्काच बसला. एवढंचं नाही, तर आरोपी एका महिलेसह पोलीस ठाण्यात आला, याच महिलेने त्याची जामीन केली आणि आपण पैसे परत करणार असल्याचे पोलिसांना सांगितले.

एकाच कॉलनीत दोन पत्नी

या प्रकारानंतर पीडितेने दुसऱ्या महिलेला गुपचूप भेटून त्याची चौकशी केली. नंतर तिची त्याच कॉलनीतील आणखी एका महिलेशी ओळख झाली जिचे बाबूशी लग्न झाले होते. आरोपी हा दिवसा एका शिप्टला आणि रात्री दुसऱ्या शिफ्टला जातो असं दोन्ही पत्नींना खोटं सांगायचा आणि प्रत्येकीसोबत वेळ घालवायचा, अशाप्रकारे तो पीडितांची फसवणूक करत होता.

या दोन्ही पीडित महिलांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर बाबूने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. तसेच कोणाकडूनही पैसे घेतले नसल्याचा दावा त्याने केला. मात्र, प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या आरोपींने अमेरिकेत राहणाऱ्या हैदराबादमधील एका महिलेची 35 लाख रुपयांना फसवणूक केल्याने त्याला अटक करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT