Massive security breach in Lok Sabha amol shinde  Saam tv
देश विदेश

Amol Shinde: लोकसभेतील घटननेनंतर लातूरचा अमोल शिंदे काय म्हणाला? दिल्ली पोलिसांनी दिली मोठी माहिती

Amol shinde reacts after Massive security breach in Lok Sabha: या प्रकारानंतर अमोल शिंदेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही, अशी माहिती आरोपी अमोल शिंदेने दिल्ली पोलिसांना दिली आहे.

Vishal Gangurde

lok sabha security breach case update:

संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. लोकसभेत खासदार बसलेल्या बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर अमोल शिंदेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही, अशी माहिती आरोपी अमोल शिंदेने दिल्ली पोलिसांना दिली आहे. (Latest Marathi News)

संसदेच्या सभागृहात आणि बाहेर चार जणांनी आंदोलन केलं. या चार जणांपैकी महाराष्ट्रातील एकाचा सामावेश आहे. संसदेच्या बाहेर आंदोलन करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूरचा असून तो पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती हाती आली आहे.

संसदेत आणि बाहेर आंदोलन करणाऱ्या चारही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. लातूरच्या तरुणाने दिल्ली पोलिसांच्या चौकशीत मी कुठल्याही संघटनेशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?

संसदेच्या सुरक्षा भेदल्याप्रकरणातील प्राथमिक तपासात उघड झालं की, 'अमोल आणि नीलम या दोघांना संसदेच्या बाहेरील संकुलात पकडण्यात आलं. हे दोन लोक मोबाईल फोन बाळगत नव्हते. त्यांच्याकडे कोणतीही बॅग किंवा ओळखपत्र नव्हतं. 'घुसखोर' अमोल शिंदे दावा केला आहे की, स्वत: संसदेत पोहोचला. त्याने कुठल्याही संघटनेशी संबंधित असल्याशी नकार दिला आहे. चौकशीसाठी पोलीस विशेष टीम तयार करत आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहे अमोल शिंदे?

लोकसभा सभागृहात आणि बाहेर आंदोलन करणारा अमोल शिंदे हा लातूरचा आहे. तो पोलीस भरतीची तयारी करत होता. तो लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील झरी (बुद्रूक) येथील रहिवासी आहे.

अमोलचे आईवडील मोलमजुरी करतात. गेल्या अनेक दिवसांपासून तो गावात राहत नव्हता. पोलीस भरतीसाठी तो दुसऱ्या गावाला राहत होता, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ

Nashik Tourism: नक्कीच माथेरान-महाबळेश्वर विसराल, नाशिकपासून ४५ किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT