Massive Rock Smashed Car in nagaland Saam TV
देश विदेश

Massive Rock Smashed On Car: घाटात भलामोठा दगड कारवर आला; दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी, भयानक VIDEO आला समोर

Car Accident Viral VIdeo: राष्ट्रीय महामार्ग 29 वरील दिमापूर-कोहिमा चौपदरी रस्त्यावर चुमौकेडिमा येथे दरड कोसळली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagaland News : पावसाळ्यात घाटात किंवा डोंगराळ भागात गाडी चालवतांना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका सर्वाधिक असतो. नागालँडमध्ये अशीच एक दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहिती या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 29 वरील दिमापूर-कोहिमा चौपदरी रस्त्यावर चुमौकेडिमा येथे दरड कोसळली आहे. कारच्या मागे असलेल्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. व्हिडीओतील दृष्यांनुसार एक भलमोठा दगड डोंगळावरुन खाली येतो. या दगडाच्या मार्गात असलेल्या दोन वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दोन गाड्यांमधील दोघांचा यात मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी आहेत.

जखमींना वैद्यकीय उपचारासाठी दिमापूर येथील ख्रिश्चन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अँड रिसर्च रुग्णालयात नेण्यात आले आहे. चुमौकेडिमा परिसरातील जुन्या पोलीस चौकी गेटजवळ सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. (Latest News Update)

भूस्खलनात चार वाहनांचे नुकसान झाले. यामुळे मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. हळूहळू रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT