Chhattisgarh Encounter Saam Tv
देश विदेश

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, २७ माओवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh Maoists Encounter: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. २७ माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Priya More

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाने २७ माओवाद्यांचा खात्मा केला. या सर्व माओवाद्यांचे मृतदेह आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दंतेवाडा, नाराणपूर आणि बीजापूर जिल्ह्याच्या सीमाभागात ही चकमक सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षादलाकडून माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी सकाळी ११ वाजेपर्यंत २७ माओवाद्यांना ठार मारले. या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अबुझमद परिसरात सकाळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. अबुझमद भागातील माड परिसरात माओवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी बिजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक माओवाद्यांविरोधी कारवाई करण्यासाठी रवाना करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी झालेल्या चकमकीत २७ माओवाद्यांचा खात्म करण्यात आला. सध्या घटनास्थळावर शोधमोहिम सुरू आहे.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले, 'या चकमकीमध्ये आमचा एक जवान जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जवानांनी २७ हून अधिक माओवाद्यांना मारले. अंतिम शोध मोहीम सुरू आहे.' दरम्यान, केंद्र सरकारने देशाला माओवादीमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाकडून माओवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टालूच्या डोंगरात माओवाद्यांविरोधात २१ दिवस कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT