Agra Medical College  Saam Tv
देश विदेश

आग्रा येथील मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग; रस्त्यावरच रुग्णावर उपचार

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एसएन मेडिकल कॉलेज येथे मोठी दुर्घटना घडली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथे एसएन मेडिकल कॉलेज (Medical College) येथे मोठी दुर्घटना घडली आहे. भीषण आग (Fierce fire) लागल्याने तेथे एकच खळबळ उडाली होती. आगीची माहिती मिळताच रुग्णालयात (hospital) रुग्णांना तातडीने रुग्णालयाबाहेर काढण्यात यश आले आहे. सध्या त्यांच्यावर रस्त्यावरच उपचार सुरू करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

हे देखील पहा-

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्याबरोबरच अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वेगाने बचावकार्य देखील सुरू करण्यात आले आहे. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या रुग्णालय (Hospital) परिसरामध्ये दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. चीफ फायर ऑफिसर एआर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसमेंटमध्ये असलेल्या कचऱ्याला सर्वात अगोदर आग लागली होती आणि त्यानंतर सगळा धूर हा रुग्णालयामध्ये गेला. यामुळेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नातेवाईक आपल्या रुग्णांना घेऊन बाहेर पळू लागले होते. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली होती. या रुग्णालयामध्ये जवळपास २० ते २५ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना आता दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत आहे. याअगोदर जम्मूच्या रेजीडेन्सी रोडवर सिंलिंडरच्या स्फोटामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची सांगता सभा

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

SCROLL FOR NEXT