Shoping Mall Fire Saam Tv
देश विदेश

शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव! लहान मुलांसह ६० जणांचा मृत्यू, किंचाळ्या अन् धुरांचे लोट; थरारक VIDEO

Shopping Mall Fire: इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण मॉल जळून खाक झाला. या आगीमध्ये आतापर्यंत ६० जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण अजूनही मॉलमध्ये अडकले आहेत.

Priya More

इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये लहान मुलांसह ६० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अल-कुत शहरातील एका शॉपिंग मॉलला बुधवारी रात्री उशिरा आग लागली. अचानक भडका उडाला आणि संपूर्ण शॉपिंग मॉलला आगीने वेढा घातला. ही आग लागली तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक होते त्यांना बाहेर पडता आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, इराकच्या अल-कुत शहरातील शॉपिंग मॉलला बुधवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेत आतापर्यंत ६० जण जिवंत जळाले. तर अनेक जण अद्यापही मॉलमध्ये अडकले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही आग इतकी भीषण आहे की ती वाढतच चालली आहे. मॉलच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने वासितचे गव्हर्नर मोहम्मद अल-मियाही यांनी आगीची माहिती दिल्याचा सांगितले. सोशल मीडियावर या भीषण आगीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. काही क्षणातच ही आग शॉपिंग मॉलच्या एक-एक मजल्यावर पोहचली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे.

महत्वाचे म्हणजे, ही आग लागली तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये अनेक जण उपस्थित होते. आग लागताच एकच गोंधळ उडाला. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले पण काहींना वेळीच बाहेर पडता आले नाही. ता आगीमध्ये ६० जणांचा मृत्यू झाला अजून अनेक जण मॉलमध्ये अडकून आलेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आतापर्यंत ५९ मृतदेहांची ओळख पटवली आहे. पण एकाचा मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे ओळख पटवणं कठीण झाले आहे. मॉलमध्ये अजून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे त्यांचे मृतदेह बाहर काढण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या शॉपिंग मॉलला आग लागण्यामागचे कारण शोधले जात आहे. पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

SCROLL FOR NEXT