Iran Blast Saam tv
देश विदेश

Iran Blast : भीषण स्फोटात ४ जणांचा मृत्यू, ५००हून अधिक जखमी; अर्थव्यवस्थेलाही हादरा, इराणमध्ये नेमकं काय घडलं?

Iran Blast News : इराण देश भीषण स्फोटाने हादरलाय. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झालाय. तर ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Vishal Gangurde

इराण भीषण स्फोटाने हादरलं आहे. इराणच्या बंदर अब्बास शहरात शनिवारी भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भीषण स्फोट हा अब्बास शहराच्या राजई बंदरावर झाला आहे.

इराणमध्ये झालेल्या स्फोटाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भीषण स्फोटानंतर हवेत धुरांचे लोट पसरले आहेत. भीषण स्फोटानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ हल्ला कसा झाला, याची माहिती दिलेली नाही. राजई बंदर हे इराणमधील प्रसिद्ध बंदरापैकी एक आहे. इराणच्या सीमा शुल्क विभागाकडून अधिकृत भाष्य करण्यात आलंय.

सीमा शुल्क विभागाकडून सांगण्यात आलं की, 'भीषण स्फोट शनिवारी सिना कंटेनर यार्डात झाला आहे. बंदर आणि सागरी संघटनाशी संबंधित कंटेनर यार्डमध्ये स्फोट झाला. इराणी वृत्त संस्थाकडून सांगण्यात आलं की, 'प्राथमिक रिपोर्टमध्ये स्फोटानंतर ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीत निष्काळजीपणा समोर आला आहे'.

राजई बंदरातील भीषण स्फोटाचे हादरे दूर असलेल्या घरांना बसले आहेत. अनेक किलोमीटर दूर असलेल्या घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या आहेत. घर आणि कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीषण स्फोट शनिवारी दुपारी १२ वाजता झाला. इराणच्या राजई बंदरावर कंटेनराची मोठी ने-आण होते. राजई बंदर इराणचं सर्वात मोठं बंदर आहे. अब्बास फारस खाडीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर हे बंदर आहे. राजई बंदर हे इराणचं मुख्य व्यापाराचं केंद्र आहे. या बंदरातून मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात होते.

तसेच जगभरात विविध वस्तूंची निर्यात आणि आयात या बंदरातून होते. राजई बंदर हे इराणी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या राजई बंदराची प्रादेशिक आणि जागतिक राजकारणातही महत्वाची भूमिका असते. इराणने ओमानमध्ये अमेरिकेसोबत परमाणूवर तिसरी संवाद दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्याचं नेतृत्व अमेरिकेचे दूतावास स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT