meghalaya Massive Explosion Saam tv
देश विदेश

कोळसा खाणीत भीषण स्फोट; 10 मजुरांचा मृत्यू, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी

Meghalaya Massive Explosion: मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात 10 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

मेघालयातील ताशखाईमध्ये कोळसा खाणीत स्फोट

स्फोटात १० मजुरांचा मृत्यू

स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव

मेघालयातील ताशखाई भागातील एका कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कमीत कमी १० मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, ताशखाईच्या कोळसा खाणीत अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटावेळी खाणीत १० हून अधिक मजूर काम करत होते. स्फोट झाल्यानंतर मजुरांना बाहेर काढण्याआधी काहींची प्राणज्योत मालवली. बहुतांश मृत मजूर आसाममधील होते, असा दावा करण्यात येत आहे. परंतु प्रशासनाने याबाबत दुजोरा दिलेला नाही.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मजुरांपैकी एक मजूर आसामच्या कटिगारा भागातील बिहारा गावात राहणारा होता. खाणीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक मदतीला धावलं. खाणीत आणखी कोणी अडकलं आहे का, याचा तपास सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

प्रशासनाने कोळसा खाणीला वेढा घातला आहे. कोळसा खाणीत नेमका स्फोट कसा झाला, याचा तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, खाणीत गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासानंतर नेमका कशामुळे स्फोट झाला, हे स्पष्ट होणार आहे.

स्फोटानंतर मजुरांची सुरक्षा आणि अनधिकृत खाणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या स्फोटाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. खाणीत १० मजुरांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्फोटामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Chocolate for Period: डार्क चॉकलेट खाल्ल्याने खरंच कमी होतो मासिक पाळीचा त्रास? जाणून घ्या सत्य!

Maharashtra News Live Update: ऐन हिवाळ्यात सिंधुदुर्गात पावसाच्या सरी

Dates Benefits : रोज खजूर खाण्याचे हे ७ जबरदस्त फायदे! पचनापासून हृदया पर्यंत शरीराला होतात अनेक फायदे

सुनेत्रा पवारांनी पक्षात भाकरी फिरवली! उपाध्यक्षपदी 'या' नेत्याची निवड, राष्ट्र्रवादीत मोठा उलटफेर

Maharashtra Exam Fee Refund : दीड लाख विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्काचे ५० टक्के पैसे थेट खात्यात जमा होणार

SCROLL FOR NEXT