पाकिस्तानच्या मोस्ट वॉन्टेड यादीत मसूद अझहर saam tv
देश विदेश

पाकिस्तानची जागेवर पलटी! स्वतःच पोसलेल्या दहशतवाद्यावर ७० लाखांचा 'इनाम'

Masood Azhar ₹70 lakh reward by Pakistan FIA : दहशतवादी मसूद अझहर हा त्यांच्या देशात नसल्याचा दावा पाकिस्तानकडून २०२१ पासून केला जात आहे. त्यावर्षी एआयएने त्याच्यावर पाकिस्तानी चलनानुसार, ५० लाख रुपयांचा इनाम ठेवला होता. त्यात ५ वर्षांनी वाढ केली असून, ती ७० लाख केली आहे.

Nandkumar Joshi

पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) २०२६ मधील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर केलीय. त्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या नावाचाही समावेश आहे. एफआयएनं अझहरवर इनाम घोषित केला असून, त्यात आधीपेक्षा २० लाख पाकिस्तानी रुपयांनी वाढ केली आहे. आता ही रक्कम ७० लाखांवर गेली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या (FATF) बैठकीपूर्वी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 'ग्रे लिस्ट'मध्ये पुन्हा जाण्याचा धोका असल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांवर कारवाई करत असल्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. अझहरला यादीत टाकणे हा केवळ एक दिखावा असू शकतो, असं भारतीय सूत्रांचं म्हणणं आहे.

मसूद अझहर त्यांच्या देशात नसून तो अफगाणिस्तानला पळून गेला आहे, असा दावा पाकिस्तानकडून साधारण २०२१ पासून करण्यात येत आहे. त्याच वर्षी FIA ने त्याच्यावर ५० लाख पाकिस्तानी रुपयांचा इनाम ठेवला होता. आता ५ वर्षांनी ही रक्कम वाढवली आहे. ती ७० लाख करण्यात आली आहे. भारतावरील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे अझहर हाच मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं जातं. त्यात फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा हल्ल्याचाही समावेश आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या मागील सहा महिन्यांच्या तांत्रिक विश्लेषणानुसार, अझहर अफगाणिस्तानमध्ये नसून पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नवाबशाह शहरात लपून बसलाय. एफआयएच्या नवीन 'रेड बुक'मध्ये २६-११ च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित १९ दहशतवाद्यांची नावेही आहेत. यामध्ये हल्लेखोरांना मदत करणारे, त्यांना पैसा पुरवणारे किंवा बोटींची व्यवस्था करणाऱ्यांचाही समावेश आहे.

एफआयएनुसार, २६-११ हल्ल्याशी संबंधित सर्व १७ दहशतवादी गेल्या १८ वर्षांपासून फरार आहेत. हे सर्व अजूनही पाकिस्तानमध्येच असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे आहे, असा सूत्रांचा दावा आहे. त्यांना मोस्ट वॉन्टेड यादीत टाकणे हा आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्याचा एक प्रयत्न असू शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या यादीत ५ वर्षांत मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे. २०२१ च्या रेड बुकमध्ये १३३० नावे होती, तर नव्या यादीत ही संख्या १८०४ वर पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT